घरमनोरंजन‘छपाक’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान दीपिकाला अश्रू अनावर

‘छपाक’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान दीपिकाला अश्रू अनावर

Subscribe

संपूर्ण शूटिंग झाल्यानंतर पडद्यावर ट्रेलरच्या स्वरुपात कथेची झलक पाहिल्याने झाली भावूक

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा प्रतिक्षेत असणाऱ्या छपाक या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान चित्रपटाची संपुर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी भावूक झालेल्या दीपिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा दीपिकाला ट्रेलरविषयी बोलायला सांगितले, त्यावेळी तिला रडू आवरले नाही ती भावूक झाली. संपूर्ण शूटिंग झाल्यानंतर पडद्यावर ट्रेलरच्या स्वरुपात कथेची झलक पाहिल्याने ती भावूक झाली.

- Advertisement -

काही चित्रपट स्वीकारताना त्याची कथा वाचून समजून घेतो. पण मेघना जेव्हा माझ्याकडे छपाकची कथा घेऊन आल्यानंतर त्याची कथा जाणून घेतल्यानंतर मी लगेच होकार दिला. मात्र, पडद्यावर ही कथा किंवा ती भूमिका साकारण्यात सर्वात मोठा वाटा आणि श्रेय मेघना गुलजार यांचे आहे, असे दीपिका यावेळी म्हणाली.

- Advertisement -

अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत असून कौतुक देखील करण्यात येत आहे.

असा आहे ट्रेलर

अॅसिड अटॅक सारख्या संवेदनशील विषयावर आधारीत छपाक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून अंगावर काटा आणणारा आणि मना चिड निर्माण करणारा असा हा ट्रेलर आहे. दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने प्रमुख भूमिका साकारली असून लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटाचे कथानक आहे. साधारण २ मिनिटे २० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अॅसिड हल्ले आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम, त्या विरोधातील संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -