घरताज्या घडामोडीDefamation Case : कंगना रनौतला मोठा दिलासा ; न्यायालयाने जावेद अख्तरची याचिका...

Defamation Case : कंगना रनौतला मोठा दिलासा ; न्यायालयाने जावेद अख्तरची याचिका फेटाळली

Subscribe

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती.ही याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे.२०२० मध्ये जावेद अख्तर यांनी एका मुलाखती दरम्यान कंगनाने दिलेल्या काही विधानांबाबत अंधेरी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि जेष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या मानहानी प्रकरणी मुंबई न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कगंनाच्या बाजूने घेतला गेला असून, कंगनाला मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक,गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. ही याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे. कंगनाविरुद्ध अजामिनपत्र वॉरंट जारी करण्यासाठी जावेदने मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात अर्ज केला होता. काल मंगळवारी ४ जानेवारीला त्यांची मागणी फेटाळली आहे. २०२० मध्ये जावेद अख्तर यांनी एका मुलाखती दरम्यान कंगनाने दिलेल्या काही विधानांबाबत अंधेरी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रनौत एका मुलाखतीत सुशांतच्या मृत्यूसंबंधित बोलताना जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला होता. जावेद अख्तर हे सुशांत सिंगच्या सुसाइड गँगचा हिस्सा असल्याचे कंगनाने मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे सोशल मिडियावर जावेद अख्तर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.याशिवाय त्यांना धमकीचे मॅसेज आणि कॉलसुद्धा यायला लागले होते. एकंदरीत कंगना रनौतच्या वक्तव्यामुळे जावेद अख्तर यांची बदनामी झाली.याप्रकरणी जावेद अख्तर यांनी कंगना रनौतवर भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि कलम ५०० (बदनामीची शिक्षा) असे आयपीसी अंतर्गत आरोप लावले होते.

- Advertisement -

एनआयच्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज म्हणाले की, न्यायालयाने कंगना रणौतविरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी फेटाळली आहे.यावरील पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालायात होणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा – india lockdown : वाढत्या संसर्गामुळे वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू; जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -