घरताज्या घडामोडीफरान अख्तरच्या 'तूफान' सिनेमा बॉयकॉट करण्याची होतेय मागणी

फरान अख्तरच्या ‘तूफान’ सिनेमा बॉयकॉट करण्याची होतेय मागणी

Subscribe

तूफान हा सिनेमा १६ जुलै रोजी अँमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अभिनेता फरान अख्तरचा येऊ घातलेला ‘तूफान’ हा सिनेमा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला असून सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Demand for boycott of Farran Akhtar’s ‘Toofan’ movie)  सध्या सोशल मीडियावर #BoycottToofan ट्रेंड होत आहे. अनेकांनी हा हॅशटॅह वापरुन आपली मते ट्विटच्या माध्यामातून मांडली आहे. फरान अख्तरचा तूफान हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा सिनेमा असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तूफान सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. तूफान हा सिनेमा १६ जुलै रोजी अँमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

- Advertisement -

तूफान सिनेमा अभिनेता फरान अख्तर हा बॉक्सर असून अजीज अली असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. तर अभिनेत्री मृणाल ठाकूर डॉक्टर अनन्या हे पात्र साकारणार आहे. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेते परेश रावल कोच प्रभु हे पात्र साकारत असून सिनेमात याव्यतिरिक्त अभिनेत्री सुप्रिया पाठक, हुसैन दलाल, मोहन आगाशे आणि दर्शन कुमार हे कलाकार देखील मुख्य भूमिका सकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे.

- Advertisement -

भाग मिल्खा भाग या सिनेमानंतर अभिनेता फरान अख्तर पुन्हा एकदा त्याच धाटणीची सिनेमा करत आहे. तूफान हा सिनेमा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. जबरदस्त मसक्यूलर बॉडी बनवून फरान अख्तर बॉक्सिंग रिंगमध्ये घाम गाळताना दिसणार आहे.


हेही वाचा  – Tiger 3 : भाईजानला टक्कर देण्यासाठी इमरान हाशमी होतोय सज्ज !

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -