घरमनोरंजनअभिनेता दिलीपकुमार यांच्या लहान भावाचेही मुंबईत कोरोनामुळे निधन

अभिनेता दिलीपकुमार यांच्या लहान भावाचेही मुंबईत कोरोनामुळे निधन

Subscribe

१२ दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान यांचाही कोरोनाने लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला होता

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे लहान भाऊ एहसान खान यांचे रात्री ११ वाजता मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढत होता. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. एहसान खान यांना कोरोनासह ह्रदयाचे आजार, हायपर टेन्शन आणि अल्झाइमरसारखे आजारही होते आणि ते ९० वर्षांचे होते.

दिलीपकुमार यांनी १२ दिवसांत २ भाऊ गमावले

लीलावती रुग्णालयात एहसान खान यांच्यावर डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. कोरोनाची लागण त्यात अन्य आजारांची गुंतागुंत यामुळे एहसान यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. १२ दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान यांचाही कोरोना संसर्गामुळे लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे दिलीपकुमार यांचे दुसरे बंधू अस्लम खान यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. २१ ऑगस्ट रोजी अस्लम खान यांचे निधन झाले. अस्लम हेसुद्धा लीलावती रुग्णालयातच उपचार घेत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोनानेचे त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

गेल्या कित्येक दिवसांपासून दिलीपकुमार यांचे सोशल मीडियावरील चाहतेही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त होते. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात दिलीपकुमार यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरल्या होत्या. त्यावर दिलीपकुमार यांच्यावतीने अधिकृत माहिती देऊन अफवांना पूर्णविराम देण्यात आला होता. दिलीपकुमार यांची प्रकृती उत्तम आहे. ते घरीच विश्रांती घेत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांनी सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. पत्नी सायरा बानू त्यांची पूर्ण काळजी घेत आहेत, असे सांगण्यात आले होते.


अमिताभ बच्चन यांची नात नव्या डिप्रेशनची शिकार; व्हिडिओतून व्यक्त केल्या भावना!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -