घरमनोरंजनदिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल

दिप्ती सती ठरली पहिली ‘लकी’ गर्ल

Subscribe

महाराष्ट्रात सर्वत्र झळकलेल्या लकी सिनेमातली हिरोइन दिप्ती सतीचे हे ‘जी ले जरा’ गाणे नुकतेच सोशल मीडियावरून लाँच झाले आहे.

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नवी हिरोइन लाँच होताना, तिच्यासाठी फिल्ममेकर्सनी खास ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँग बनवण्याची परंपरा नवी नाही. मात्र मराठी सिनेसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीने पहिलं पाऊल ठेवताना तिच्यासाठी खास इंट्रोडक्शन साँग बनणे, हे कधी झाले नाही. पण संजय जाधव हे नेहमी आपल्या सिनेमांमधून काहीतरी हटके करण्यासाठी प्रचलित आहेत. त्यामूळेच त्यांनी आपल्या ‘नव्या’ हिरोइनसाठी खास हिरोइन-इंट्रोडक्शन साँग केले आहे. ७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र झळकलेल्या लकी सिनेमातली हिरोइन दिप्ती सतीचे हे ‘जी ले जरा’ गाणे नुकतेच सोशल मीडियावरून लाँच झाले आहे. यो (सचिन पाठक) ने लिहीलेल्या गीताला पंकज पडघन ह्यांनी संगीत दिले आहे. आणि शाल्मली खोलगडेने हे गाणे गायले आहे.

“बॉलीवूड आणि तमिळ सिनेमांमध्ये हिरोइनला लाँच करताना, तिचे पहिले गाणे खूप स्पेशल असावे, ह्यावर भर दिला गेलेला मी पाहिलाय. पण मराठीत असे साँग मी पाहिले नव्हते. फिल्ममध्ये लावणीने हिरोइनची एन्ट्री झालेली आहे. पण तिचा पहिला-वहिला सिनेमा असताना तिचे खास इंट्रोडक्शन करण्यासाठी कधी साँग बनवले गेले नव्हते. माझ्या हिरोइनचीही कधी अशी एन्ट्री व्हावी असं मला नेहमी वाटायचं. दिप्ती उत्तम डान्सर आहे. ती कथ्थक आणि भरतनाट्यममध्ये विशारद आहे. तर हिपहॉप आणि फ्री स्टाइल डान्सिंगही तिला खूप चांगली जमते. त्यामूळे मी माझी खूप वर्षांपासूनची ‘हिरोइन-इंट्रोडक्शन’ साँगची इच्छा ‘जी ले जरा’ गाण्याने पूर्ण केली.” – संजय जाधव, फिल्ममेकर

- Advertisement -

“कोणत्याही अभिनेत्रीसाठी सिनेसृष्टीत असे लाँच मिळणे, हे स्वप्नवत आहे. त्यामूळे मी संजयदादांची खूप ऋणी आहे, की त्यांनी मला एवढ्या धमाकेदार एनर्जेटिक गाण्याने सिनेसृष्टीत लाँच केले.” – दिप्ती सती, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -