घरमनोरंजनझी मराठीवर चार नव्या मालिकांची एंट्री, 'या' मालिका घेणार निरोप

झी मराठीवर चार नव्या मालिकांची एंट्री, ‘या’ मालिका घेणार निरोप

Subscribe

झी मराठीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मन झालं बाजिंद,माझी तुझी रेशीमगाठ,ती परत आलीये या नव्या मालिकेनंतर आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या प्रोमोमध्ये अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसतेय. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे, पण या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.
या मालिकेबद्दल बोलताना अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारते त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

या मालिका घेणार निरोप-

लॉकडाऊन नंतर सध्या झी मराठी वरील ‘देवमाणूस’, ‘अग्गबाई सुनबाई’, ‘कारभारी लयभारी’ या तिन्ही मालिकांचा टीआरपी घटल्याने या मालिका संपण्यावर भर दिला जात आहे. या तीन मालिकांसोबतच आता ‘माझा होशील ना’ ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे संकेत देण्यात आले आहे. कोरोनामुळे चित्रीकरण बंद करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले होते यामुळे रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा भागाचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसतेय. लवकरच या मालिकांची वाहिनीवरुन एक्जीट होणार आहे. तसेच आगामी मालिकांची वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे.आता या नव्या मालिका प्रेक्षकांवर कितपत भुरळ घालू शकतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – यंदा कर्तव्य आहे, फरहान-शिबानी अडकणार विवाह बंधनात?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -