घरमहाराष्ट्रसावधान ! पुण्यात 'वास्तूशोध' करताय, परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली कुलकर्णीकडून कोट्यवधींची फसवणूक

सावधान ! पुण्यात ‘वास्तूशोध’ करताय, परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली कुलकर्णीकडून कोट्यवधींची फसवणूक

Subscribe

25 गुंतवणूकदारांना सुमारे 7 कोटींचा चुना लावल्याप्रकरणी वास्तुशोध रियॅलिटीच्या सचिन कुलकर्णी आणि नितिन कुलकर्णी यांना पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

जर तुम्ही पुण्यात घर खरेदी किंवा सेकंड होम घेण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण माफक दरात घरं देतो असे आमिष दाखवत सामान्य नागरिकांकडून पैसे उकळणारी बिल्डर लॉबीच पुणे येथे सक्रिय झाली आहे. असेच आमिष दाखवत 25 गुंतवणूकदारांना सुमारे 7 कोटींचा चुना लावल्याप्रकरणी वास्तुशोध रियॅलिटीच्या सचिन कुलकर्णी आणि नितिन कुलकर्णी यांना पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या दोघांना शनिवारपपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची बँक खातीही सील करण्याची तयारी सुरू झाली आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने अनेकजण पुण्याला सेकंड होमच्या पर्यायासाठी निवडतात. तर काही पुणेकरच स्वस्तात घर मिळत असल्याने घर खरेदी करत आहेत. पण याचाच गैरफायदा घेत पुण्यातील वास्तुशोध रेअलिटीचे सचिन आणि सतीश या कुलकर्णी बंधूनी शेकडो ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एरंडवणे येथील रहीवासी निवृत्ती कातुर्डे (४९) यांनी २०१५ साली सचिन कुलकर्णी व नितिन कुलकर्णी यांच्या वास्तुशोध प्रकल्पातील कोंढवे-दावडे येथील प्रकल्पात टू बीच के फ्लॅट बुक केला होता. कुलकर्णी यांनी तीन वर्षात फ्लॅटचा ताबा मिळेल असे आश्वासन कातुर्डे यांच्यासह अन्य १८ मेंबसर्ना दिले. यामुळे डाऊनपेमेंट बरोबरच फ्लॅटसाठी अतिरिक्त पैसे भरावे लागणार असल्याने कातुर्डे यांच्यासह काही मेंबर्सनी बँकेतून लोन घेतले. त्यानंतर बँकेतून त्यांचे नियमित ईएमआय़ (हप्ते) जाऊ लागले. इमारत बांधकामासाठी कुलकर्णी यांनी या १८ मेंबर्सकडून तब्बल ५ कोटी 70 लाख रुपये घेतले.
कातुर्डे यांच्याप्रमाणेच मुंबई, उल्हासनगर, ठाणे आणि पुणे येथील गुंतवणूकदारांनीही वास्तूशोधच्या सतीश आणि सचिन कुलकर्णी यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार केली आहे.

- Advertisement -

पण नंतर निर्माणाधीन असलेल्या इमारतीचे कामच बंद करण्यात आले. यामुळे सर्वच मेंबर्स हवालदिल झाले. त्यातच २०२१ उगवले. यामुळे कातुर्डे यांच्यासह इतर १८ मेंबर्सनी कुलकर्णी यांना जाब विचारला. त्यावर जमिन मालक मजूरांना इमारतीच्या आवारातच प्रवेश करू देत नसल्याचे कातुर्डे यांना कुलकर्णी यांच्याकडून सांगण्यात आले. यामुळे कातुर्डे व अन्य मेंबर्सनी उत्तम नगर पोलिसात धाव घेतली.

त्यानंतर फसवणुक केल्याप्रकरणी सचिन कुलकर्णी व नितिन कुलकर्णी यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने या दोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुलकर्णी यांनी वास्तुशोध रिअॅलिटी अंतर्गत पुणे शहरात कमी वेळेत विविध ठिकाणी सामान्यांना परवडणारी घरे या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू केले होते. यामुळे मुंबई व पुण्यासह इतर ठिकाणी राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी वास्तुशोध प्रकल्पात घऱ बुक केली. पण पाच वर्ष उलटूनही त्यातील अनेक घरांचे बांधकाम अपू्र्णच आहेत. यामुळे महारेराच्या अंतर्गत कुलकर्णी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्यावे. अशी मागणी मेंबर्सनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुणे झोन- ३ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले कि दाखल झालेल्या तक्रारीनुसार वास्तुशोधचे संचालक सचिन कुलकर्णी यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच ‘वास्तुशोध’च्या अंतर्गत अशाच प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -