घरदेश-विदेशआता विषारी दारू विकणाऱ्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा; शिवराज सरकारचा मोठा निर्णय

आता विषारी दारू विकणाऱ्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा; शिवराज सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

मध्यप्रदेशात अवैध दारू विक्रीवर आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. अवैध दारूमुळे कोणाचा मृत्यू झाला तर आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल, असे मध्यप्रदेशच्या शिवराज सरकारने ठरवले आहे. यापूर्वी या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. याशिवाय दंडाची रक्कम १० लाखांवरून २० लाख रुपये करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आज मंगळवारी झालेल्या शिवराज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेच्या या अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक देखील आणणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच मंदसौरच्या वेगवेगळ्या भागात नकली दारूमुळे ८ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच शिवराज सरकारच्या या चौथ्या कार्यकाळात सुमारे दीड वर्षात अवैध दारूच्या सेवनामुळे ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश सरकारने दारूच्या तस्करी आणि त्याच्या अवैध धंद्याला रोखण्याच्या उद्देशाने २० पेक्षा जास्त सुरक्षा मानकांसह दारूच्या बाटल्यांवर क्यूआर कोड होलोग्राम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी असे म्हटले की, अवैध दारू व्यवसायात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. याशिवाय शेजारील राज्यांतून अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील, असे ते म्हणाले.

- Advertisement -

जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत जन्मठेप होईल आणि कोणत्या गुन्ह्यात फाशी होईल…

जर कोणी अवैध भेसळयुक्त दारू पिऊन मरण पावले तर प्रथमच आरोपीला १० वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा केली जाऊ शकते. किंवा दुसऱ्यांदा किंवा पुन्हा असाच गुन्हा केला तर आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर, मद्यामध्ये भेसळी केली असेल तर दंडाची रक्कम ३० हजार रुपयांवरून २ लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी मद्यामध्ये भेसळ केल्यास ३०० ते २ हजार रुपयांचा साधारण दंड होता.


माझ्या बदनामीसाठी नको ते आरोप करण्यात आले, मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -