घरमनोरंजनगणेशची नृत्यातली जादू

गणेशची नृत्यातली जादू

Subscribe

गंमत म्हणून गणेश आचार्य अभिनेता गोविंदासमोर नाचला आणि का कुणास ठाऊक साध्या सरळ, मोहक हालचाली गोविंदाला अधिक भावल्या. डेव्हिड धवनने गोविंदाला घेऊन जेवढे काही चित्रपट केले त्यात त्याचे नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्यने करावे असे सुचवले गेले. त्याचा परिणाम असा झाला की गणेश हा फक्त नृत्य दिग्दर्शकच राहिला नाही तर निर्माता, अभिनेता असा मोठा प्रवास त्याने केलेला आहे आणि आता ‘गणेश आचार्य डान्स अकॅडमी’ याचा तो संचालकही झालेला आहे. त्याच्या शुभारंभाला त्याने टायगर श्रॉफला निमंत्रित केले होते.

गणेशने फक्त हिंदीतल्याच नामवंत चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केलेले नाही तर मराठी भोजपुरी या भाषिक चित्रपटांचेही नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. ‘लय भारी’ या चित्रपटातल्या होळीच्या गाण्यासाठीच्या नृत्य दिग्दर्शनासाठी पुरस्कारही त्याला प्राप्त झालेला आहे. ‘चिमणी उडाली भूर्र’ या मराठी गाण्यात त्याचे घडलेले दर्शन अनेक नाच्यांना त्याच्यासारखीच स्टेप्स करायला भाग पाडते. हिंदीत रुळलेला हा कलाकार मराठी चित्रपटांनाही तेवढाच वेळ देतो. आर्थिक देवाणघेवाणीपेक्षा छान काही करता येते यातच तो खूश आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कृतांत’ या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णीला नाचायला त्याने भाग पाडलेले आहे. गणेशची जादू सर्वत्र दिसते हेच खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -