घरताज्या घडामोडीजेनिलिया देशमुखची मराठी सिनेसृष्टीत एंट्री, रितेश करणार दिग्दर्शन

जेनिलिया देशमुखची मराठी सिनेसृष्टीत एंट्री, रितेश करणार दिग्दर्शन

Subscribe

प्रेक्षक जेनिलियाची ही नवीन धमाकेदार एंट्री पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत

बॉलिवूड तसेच मराठीत क्यूट कपल रितेश आणि जेनिलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. दोघांनी देखील अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. मागील काही दिवसांपासून दोघेही सिनेसृष्टीपासून लांब राहिल्याचे पहायला मिळाले. मात्र दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होते. जेनिलिया आई झाल्यानंतर ती बराच काळ सिनेसृष्टीपासून लांब राहिली त्यामुळे जेनिलिया पुन्हा सिनेमात कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण जेनिलिया देशमुख तब्बल १० वर्षांनी  कम बॅक करत आहे. जेनिलिया ‘वेड’ या नव्या मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. जेनिलियाने तिच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. जेनिलियाने याआधी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि पहिल्यांदाच ती मराठी सिनेमात काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षक जेनिलियाची ही नवीन धमाकेदार एंट्री पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

- Advertisement -

सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .मुंबई फिल्म कंपनी ने आज ६ व्या मराठी सिनेमाची घोषणा केली आणि या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

- Advertisement -

जेनिलियासोबत अभिनेत्री जिया शंकर या सिनेमात भूमिका साकारत आहेत. सिनेमाच आणखी एक खास आकर्षण म्हणजे सिनेमा संगितकार अजय अतुल यांचे म्युझिक असणार आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावेल यात काही शंका नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

‘माझा पहिला मराठी सिनेमा, पुन्हा एकदा नव्याने सिनेमात पदार्पण करतेय’, असे म्हणत जेनिलियाने सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. जेनिलियाने पुढे असे म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात मी अनेक भाषेतील सिनेमात काम केले. त्या सिनेमांसाठी मला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. माझा जन्म महाराष्टात झाला त्यामुळे मला मराठी सिनेमा करण्याची फार इच्छा अनेक वर्षांपासून मनात होती. तो क्षण अखेर आला. माझा पहिला मराठी सिनेमा. मी तब्बल १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करतेय,मला हे स्वप्नवत वाटत आहे, असे जेनिलियाने म्हटले आहे.


हेही वाचा – ‘मन उडू उडू झालं’ दिपूची #18 daystogo पोस्ट चर्चेत

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -