घरमनोरंजन'गोल्ड' की 'सत्यमेव जयते' कोण मारणार बाजी?

‘गोल्ड’ की ‘सत्यमेव जयते’ कोण मारणार बाजी?

Subscribe

स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षयकुमारच्या पिरियड ड्रामा 'गोल्ड'ची कलाकार आणि कथा या दोन्हीबाबत चर्चा आहे. कोण मारेल या दोन्ही चित्रपटांमध्ये बाजी?

बॉलीवूडमध्ये नेहमीच देशभक्तीचा रंग दिसून येतो. याच रंगामध्ये गेले काही वर्ष अक्षय कुमारचा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाल्याचं दिसतं. यावर्षीदेखील अक्षयकुमारचा ‘गोल्ड’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या दिवशी प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या प्रत्येक चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. मात्र यावर्षी अक्षयला टक्कर देत आहे तो जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट. त्यामुळं दोन्ही चित्रपटापैकी कोणता चित्रपट बाजी मारणार? याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे. जाणून घेऊया काय आहे ट्रेड अॅनालिस्टचं म्हणणं.

काय आहे ट्रेड अॅनालिस्टचा अंदाज?

स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या अक्षयकुमारच्या पिरियड ड्रामा ‘गोल्ड’ची कलाकार आणि कथा या दोन्हीबाबत चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला जॉन अब्राहमच्या अॅक्शन थ्रिलर ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपटाने पहिल्या दिवसापासून वादांमध्ये अडकण्यास सुरुवात केली. दोन्ही चित्रपट देशभरात साधारण २५०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. अक्षय कुमारची प्रसिद्धी पाहता, जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ ला ओपनिंग कमी मिळण्याचा अॅनालिस्टचा अंदाज आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या अंदाजानुसार अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’ची पहिल्या दिवशी साधारण १८ कोटीपर्यंत कमाई होण्याची शक्यता आहे. तर जॉनच्या चित्रपटाला साधारण १० कोटीपर्यंत ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

‘गोल्ड’ ऑलिम्पिकवर तर ‘सत्यमेव जयते’मध्ये भ्रष्टाचार

भारतानं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतला आणि भारतानं इंग्रजांना त्यांच्याच मातीत जाऊन हॉकीमध्ये हरवलं. मात्र भारत हा सुवर्णक्षण विसरला आहे. त्यामुळं ७० वर्षापूर्वीच्या सुवर्णक्षणाला जागवण्याचा प्रयत्न या ‘गोल्ड’ चित्रपटातून करण्यात आला आहे. तर ‘सत्यमेव जयते’ या जॉन अब्राहमच्या चित्रपटात पोलीस भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये जॉन अशा पोलिसांना संपवत असल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांना आवडणारे दोन्हीही विषय आहेत. त्यामुळं आता प्रेक्षक दोन्ही चित्रपटांपैकी नक्की कोणत्या चित्रपटाला पसंती देत आहेत हे १५ ऑगस्टलाच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -