घरमनोरंजनअक्षयाच्या 'गुड न्यूज'ने सलमानच्या 'दंबग ३'ला टाकलं मागे

अक्षयाच्या ‘गुड न्यूज’ने सलमानच्या ‘दंबग ३’ला टाकलं मागे

Subscribe

शुक्रवारी राज मेहता दिग्दर्शित ‘आयव्हीएफ’ या विषयावर आधारित असलेला ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर दोन दिवसात या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. तब्बल ३९.३४ कोटी रुपये ‘गुड न्यूज’ने दोन दिवसात कमावले आहे. सलमान खानच्या बहुचर्चित ‘दंबग ३’ या चित्रपटावर ‘गुड न्यूज’ चांगलाच भारी पडला आहे. या चित्रपटाला प्रक्षेकांसह विश्लेषकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाल आहे.

बहुचर्चित ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने अवघ्या १८ कोटींची कमाई केली आहे. ‘गुड न्यूज’ या चित्रपटात बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारसोबत करिना कपूर, दिलजित दोसांज आणि किआरा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. ‘गुड न्यूज’ या चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कमाईबद्दल चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं ट्विट केलं आहे.

- Advertisement -

तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी ‘गुड न्यूज’ या चित्रपटाने १७.५६ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी २१.७८ कोटींची कमाई केली. आता हा कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या माध्यमातून वारसा पुढे नेण्यासाठी असलेले मुलाचे महत्त्व आणि त्याचभोवती वर्षांनुवर्ष-पिढ्यांपिढ्या असलेली कुटुंबव्यवस्था यावर लेखिका ज्योती कपूर आणि दिग्दर्शक राज मेहता यांनी भाष्य केलं आहे.


हेही वाचा – Video: भाईजानने केलं बिग बॉस घरातील टॉयलेट साफ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -