घरमनोरंजनVideo: भाईजानने केलं बिग बॉस घरातील टॉयलेट साफ!

Video: भाईजानने केलं बिग बॉस घरातील टॉयलेट साफ!

Subscribe

सलमान खानला घरातील काम करताना पाहून सदस्यांनी माफी मागितली.

सध्या ‘बिग बॉस सीझन १३’ मध्ये वादाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. कोणत्याही कारणावरुन बिग बॉसच्या सदस्यांमध्ये सतत वाद होत आहेत. या आठवड्यात शहनाज गिल घरची कॅप्टन झाली. ती कॅप्टन झाल्यानंतर घरातील अनेक सदस्यांनी काम करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आज आपल्याला बिग घरातील काम करताना चक्क सलमान खान दिसणार आहे. भांडी घासण्यापासून ते टॉयलेट साफ करण्यापर्यंतची सगळीच काम सलू करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा एपिसोड सलू चाहत्यासाठी पाहण्यास खास ठरणार आहे.

सध्या इन्स्टाग्रामवर सलमान काम करताना व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सर्व सदस्यांना एका रुम मध्ये ठेऊन सलमान खानने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. त्यानंतर सलमानं घरातले किचन साफ करताना, भांडी घासताना, फ्रिज साफ, टॉयलेट साफ करताना दिसत आहे. हे सगळं पाहून घरचे सदस्य त्याची माफी मागताना दिसत आहेत.

- Advertisement -

शनिवारी झालेल्या विकेंडच्या वॉरमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीने घरात प्रवेश केला होता. त्याने सिद्धार्थ आणि आसिम मधील वादाबाबत दोघांची समजूत काढली आणि पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि आसिम एकत्र पाहायला मिळाले.

- Advertisement -

यानंतर रोहित शेट्टीने घरांच्या सदस्यांसोबत एक गेम खेळला. त्या गेममध्ये विजेता टीमला घरातून आलेल्या गिफ्टस् दिले. हे गिफ्ट मिळाल्यानंतर काही सदस्य भावूक झालेले दिसले.

मात्र आजच्या विकेंडच्या वॉरला कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहावे लागणार आहे.


हेही वाचा – एका भूमिकेत पंचवीस वर्षे बींग पायरो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -