घरमनोरंजनपॉप सिंगर जस्टिन बिबरबद्दल लग्न बंधनात?

पॉप सिंगर जस्टिन बिबरबद्दल लग्न बंधनात?

Subscribe

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही लग्नाचे वारे वाहू लागले असल्याचे सांगत पॉप सिंग जस्टिन बिबरने लग्न केल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. मात्र जस्टिने अद्याप लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही यामुळे अजूनही त्याच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उठवले जात आहे.

बॉलिवूडमधील काही मोठ्या अभिनेत्रींनी लग्न केल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे असल्याचे दिसून येते. मात्र हे वाले हॉलिवूडमध्येही असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत होत्या. जगप्रसिद्ध पॉपसिंगर जस्टिन बिबर याने आपली गर्लफ्रेंड अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन हीच्याशी लग्न केले अशा बातम्या झळकल्या. या बातम्या आल्यामुळे जस्टिनच्या फॅन्समध्ये एकच चर्चा रंगली. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर लगेच जस्टिनने लग्न केले असल्याने बॉलिवूडचे हे वारे हॉलिवूडमध्येही सुरू असल्याचे चित्र होते. मात्र जस्टिन किंंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे अद्याप जस्टिनचे लग्न झाले की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. जस्टिन मागील काही महिन्यांपासून हेली ला डेट करतो आहे. त्यांचे एकत्र असल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर बघायला मिळतात. त्यामुळे ही जोडी कधी लग्न करणार आहे याबद्दल फॅन्समध्ये खूप उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

Hunny buns punkin

A post shared by Justin Bieber (@justinbieber) on

- Advertisement -

अफवा की सत्य?

कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन आणि अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविन हे दोघे प्रेमसंबधात आहे. हेलीपूर्वी सेलिना गोम्स या गायिकेशी होते. हेली आणि जस्टिन एकत्र असलेले फोटो इन्स्टाग्रामवर टाकतात. न्यूयॉर्क येथील न्यायालायाबाहेरच्या फोटोमुळे त्यांनी लग्न केल्याची चर्चा होत होती. यानंतर नुकतेच हेली बाल्डविन ने आपल्या अधिकृत अकाऊंटचे नाव बदलून हेली बिबर ठेवले आहे. जस्टिनने नुकताच एक फोटो शेअर केला या खाली त्याने सर्वात भारी माझी पत्नी असे लिहिले आहे. यामुळे या दोघांनी लग्न केले असल्याचे सर्वांना वाटले होते. त्यांचे खरोखर लग्न झाले आहे की नाही यावर काहीजण प्रश्नचिन्ह उठवतात आहे.

 

 

View this post on Instagram

 

my ❤️

A post shared by Hailey Rhode Bieber (@haileybieber) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -