घरमनोरंजनदोन वर्षांनी 'हॅप्पी फिर भाग जाएगी'

दोन वर्षांनी ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’

Subscribe

दोन वर्षांपूर्वी डायना पेंटीचा आलेला चित्रपट ‘हॅप्पी भाग जाएगी’चा सिक्वल ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या चित्रपटात हॅप्पीची भूमिका डायना पेंटीनं साकारली होती. तर या चित्रपटात दोन दोन हॅप्पी दिसणार असून दुसऱ्या हॅप्पीची भूमिका सोनाक्षी सिन्हा साकारणार आहे. इतकंच नाही तर आपल्या धमाल संवादफेकीनं जिमी शेरगिलनं या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याला साथ दिली आहे ती, पियुष मिश्रानं. या दोघांच्या संवाद जुलबंदीनं ट्रेलर मजेशीर असल्याचं लक्षात येत आहे. पहिल्या चित्रपटात हॅप्पी चुकीनं पाकिस्तानात पोहचली होती तर आता हॅप्पी पोहचणार आहे चीनमध्ये.

- Advertisement -

दुसऱ्या हॅप्पीच्या भूमिकेत सोनाक्षीची धमाल

ट्रेलर बघून हॅप्पी दुसऱ्या देशात जाऊन आपल्या कामगिरींनी धमाल उडवून देत असल्याचं दिसत आहे. हॅप्पी नाव समान असल्यामुळं होणारा गोंधळ. एकाच नावामुळं दुसऱ्याच हॅप्पीचं अपहरण होणं यामधून हा चित्रपट घडला असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. तर या चित्रपटातही जिमी शेरगील आणि पियुष मिश्राच्या केमिस्ट्रीनं धमाल उडवून दिल्याचं दिसत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर मजेशीर आहे. साधारण २ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जिमी आणि पियुषच्या संवादामध्ये असलेले जोक्स धमाकेदार आहेत. हा चित्रपट २४ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून याचं दिग्दर्शन मुद्दसर अझीझ यांनी केलं आहे. तर बऱ्याच दिवसांनी सोनाक्षी सिन्हाचा मजेशीर अंदाजही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोनाक्षीनंदेखील कॉमेडीमध्ये एक वेगळा अंदाज दाखवल्याचं या ट्रेलरमधून दिसून येत आहे. आतापर्यंत सोनाक्षीला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. मात्र या अंदाजात प्रेक्षक सोनाक्षीला कसे स्वीकारतील हे लवकरच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -