घरमनोरंजनHBD:लोकांना लग्नाचे आमंत्रण दिल्यानंतर संगीता बिजलानीने मोडलं सलमान सोबत लग्न

HBD:लोकांना लग्नाचे आमंत्रण दिल्यानंतर संगीता बिजलानीने मोडलं सलमान सोबत लग्न

Subscribe

सलमान खानने  27 मे, 1994 दोघांचाही विवाह होणार असल्याचे कबूल केलं होतं.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तसेच पुर्व मिस इंडिया संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani)हिचा जन्म 9 जुलै 1960 मध्ये मुंबईतील सिंधी कुटूंबात झाला होता. संगीताने तिच्या अभिनयाने तसेच सौंदर्याने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केल. संगीताने वयाच्या 16 वर्षापासूनच मॉडलिंग करण्यास सुरूवात केली होती. 1980 साली संगीताने मिस इंडियाचा पुरस्कार प्राप्त केला. तसेच तिने 1988 मध्ये ‘कातिल’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याचदरम्यान भाईजान सलमान खानसोबत (Salmaan Khan) तिचे संबध जास्त वाढू लागल्याच्या चर्चा बॉलिवूड इंडस्ट्री तसेच माध्यमात होऊ लागल्या.
संगीता आणि सलमानने 1986 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. दोघेही जवळ-जवळ 10 वर्षे एकत्र रिलेशनशिपमध्ये होते. इतकच नाही तर दोघांनी लग्नाची तयारी देखील केली होती. चक्क लग्नाचे कार्ड छापून लोकांना आमत्रंण देण्यात आलं होत. एका मुलाखती दरम्यान सलमान खानने स्वत: या बाबतीत खुलासा केला आहे. लग्नाचे आमंत्रण लोकांना पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांचे लग्न होऊ शकले नाही. जासिम खानने लिहलेल्या पुस्तकात ‘बिइंग सलमान’ मध्ये या घटनेचा उलगडा करण्यात आला आहे की संगीताने एका इंटरव्यूमध्ये तिचे आणि सलमानचे लग्न ठरले आहे असे सांगितले होते. इतकेच नाही तरा स्वत: सलमान खानने  27 मे, 1994 दोघांचाही विवाह होणार असल्याचे कबूल केलं होतं. यानंतर अशा बातम्या पसरल्या होत्या की सलमान खान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यात जवळीक वाढू लागली आहे. संगीताला जेव्हा सोमी अली सोबत सलमानचे संबध असल्याचे कळाले तेव्हा संगीताने सलमान सोबत लग्न मोडले यांनतर तिने 1996 साली क्रिकेटर मो. अजहरुद्दीन याच्याशी विवाह केला.



हे हि वाचा – दिपिकाच्या वस्तू का ढापतोस? स्लिंग बॅगवरून रणवीर सिंह ट्रोल

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -