घरदेश-विदेशबाजारात लवकरच उपलब्ध होणार 2-DG! DRDO कडून 'या' कंपनीला मिळाला परवाना

बाजारात लवकरच उपलब्ध होणार 2-DG! DRDO कडून ‘या’ कंपनीला मिळाला परवाना

Subscribe

डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने कोरोनावरील औषध 2-DG (2-deoxy-D-glucose) ला Mankind Pharma या औषध कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग करण्यास परवाना दिला आहे. त्यामुळे लवकरच हे औषध तुमच्या जवळील औषधांच्या दुकानात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2-DG औषध ग्वालियर येथे असणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास आस्थापना (DRDE) यांनी विकसित केले आहे. पीटीआयने Mankind Pharma यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे असे सांगितले की, त्याची क्लिनिकल चाचणी डीटीडीओच्या प्रयोगशाळेद्वारे न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS) च्या एका लॅबद्वारे करण्यात आली आहे. डॉ. रेड्डीजच्या लॅबोरेटरीजच्या सहकार्याने INMAS ने हे काम केले.

असे सांगितले जात आहे की, 2-DG हिमाचल प्रदेश आणि विशाखापट्टणममधील कारखान्यांमध्ये तयार करण्यात येणार असल्याचे Mankind यांनी सांगितले आहे. भारतीय औषध नियामक DCGI ने 1 मे रोजी कोरोनातील सामान्य आणि गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी 2-DG वापरण्यास परवानगी दिली आहे.  कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर या रूग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून आले. यामुळे कोरोना रूग्णाला लवकर रिकव्हर होण्यास मदत झाली, असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर या औषधामुळे कोरोना रूग्णाचे ऑक्सिजनवर अवलंबन राहणेही कमी झाले आहे.

- Advertisement -

डीआरडीओने हे औषध हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीसोबत मिळून तयार केले आहे. हे औषध एका पाउचमध्ये उपलब्ध असणार आहे. जसे आपण ओआरएस पाण्यात घालून पितो, त्याचप्रमाणे हे पाण्यात घालून प्यायचे आहे. दिवसातून हे औषध दोनवेळा घ्यायचे आहे. कोरोना रुग्णाला पूर्णपणे बरे व्हायचे असेल तर ५ ते ७ दिवस हे औषध घ्यावे लागणार आहे, असे INMASचे वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी सांगितले होते. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमी असेल त्याच्यासाठी हे औषध एक वरदानच्या स्वरुपात असेल.

2-DG औषध कोणाला द्यावे?

  • डीआरडीओने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाद्वारे मान्य झालेले निर्देश जारी केले आहेत. यानुसार जे कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, त्या रुग्णांना हे औषध दिले जाऊ शकते.
  • हे औषध कोरोबाधिताला पहिल्या १० दिवसांच्या आत किंवा त्यापूर्वी दिले पाहिजे.
  • अनियंत्रित मधुमेह, गंभीर ह्रदयरोगाचे रुग्ण, एआरडीएस, गंभीर यकृताचा त्रास आणि मुत्र विकार असलेल्या रुग्णांवर आतापर्यंत २ डीजी औषधाची चाचणी केली नाही आहे. त्यामुळे या रुग्णांना हे औषध दिले नाही पाहिजे.
  • तसेच २ डीजी औषध गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना दिले नाही पाहिजे. याशिवाय १८ वर्षांखालील किशोरवयीन मुलांना देखील हे औषध नाही दिले पाहिजे.
  • जर रुग्णांना किंवा कुटुंबातील सदस्यांना हे औषध पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या रुग्णालयाला औषध पुरवण्यासाठी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबशी संपर्क करण्यासाठी सांगावे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -