घरताज्या घडामोडीप्रसिद्ध सिंगर आणि रॅपर Chris Brown अडचणीत, महिलेला ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा...

प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर Chris Brown अडचणीत, महिलेला ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप

Subscribe

क्रिस ब्राउनने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला फोन करुन प्रेग्नंसीपासून वाचण्यासाठी प्लान बी घेण्याची धमकी दिली

प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर क्रिस ब्राउन ( Chris Brown)  सध्या चर्चेत आला असून कॅलिफोर्नियामध्ये एका महिलेने क्रिस ब्राउन विरोधात बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. Jane Doe असे आरोप करणाऱ्या महिलेचे नाव असून दारुमध्ये ड्रग्ज मिसळून  क्रिस ब्राउनने यॉटमध्ये (नौका)  माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. महिलेने याप्रकरणी क्रिसकडून 20 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 150 करोड रुपयांची मागणी केली आहे.

सिविल सूटने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी क्रिस ब्राउन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत असे लिहिले म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2020रोजी मियामी येथे पोहोचल्यावर क्रिसने महिलेला आपल्या यॉटमध्ये बोलावले होते. ही महिला एक कोरिओग्राफर, डान्सर, मॉडेल आणि म्युझिक आर्टिस्ट आहे. क्रिसने आधी दारुत ड्रग्ज मिसळून मला पाजली. दारु प्यायल्यानंतर मला कसे तरी होऊ लागले. फिजिकली देखील मला ठिक वाटत नव्हते.  महिलेच्या म्हणण्यानुसार क्रिसने तिला जबरदस्तीने बेडरुममध्ये नेले आणि बलात्कार केला.

- Advertisement -

पीडित महिलेचे वकील एरियल मिशेल आणि जॉर्ज व्राबेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या अब्रू खातर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. पोलिसांना ही माहिती देण्याची तिची हिम्मत होत नव्हती.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, क्रिस ब्राउनने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला फोन करुन प्रेग्नंसीपासून वाचण्यासाठी प्लान बी घेण्याची धमकी दिली होती. पीडित महिला तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणार आहे. तिच्या सोबत जे झाले इतर कोणाबाबत होऊ नये त्यांच्यासाठी मी उदाहरण असेन असे तिला वाटते.

- Advertisement -

या प्रकरणानंतर ग्रॅमी अवॉर्ड विजेता क्रिस ब्राउनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, जेव्हा मी माझा नवा म्युझिक प्रोजेक्ट रिलीज करतो तेव्हा काहीना काही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोट. क्रिसने अस्पष्टपणे या केसवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा – त्या’ डिनर डेटनंतर तुटले Ibrahim Ali Khan आणि Palak Tiwariचे नाते? काय घडलं त्या रात्री?    

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -