घरमनोरंजनआग्रह महाराष्ट्रीयन जेवणाचा

आग्रह महाराष्ट्रीयन जेवणाचा

Subscribe

संजय लीला भन्साली, रोहित शेट्टी, मधुर भंडारकर यांचे चित्रपट लक्षात घेतले तर त्यात बर्‍याचशा मराठी कलाकारांचा सहभाग पहायला मिळालेला आहे. राकेश ओमप्रकाश मोहरा हासुद्धा मराठी कलाकारांच्या प्रेमात पडलेला आहे. मेरे प्यारे प्रायमिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे. या चित्रपटात अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी, नचिकेत पूर्णापात्रे या मराठी कलाकारांना घेतले खरे पण सेटवर महाराष्ट्रीयन पद्धतीचेच जेवण असायला पाहिजे हा आग्रह पूर्ण करताना सेटवरील सर्वांचाच आवडीचा तो भाग होईल असे त्याला स्वत:ला वाटले नव्हते.

महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे ठराविक पदार्थांची रेलचेल असे काहीसे मोहरा यांना वाटत होते. पण शूटींगच्या दरम्यान मागवले जाणारे पदार्थ, त्यातला स्वाद, रुची टीलमा इतकी आवडू लागली की पुढे त्यांना पंक्तीने जेवायला बसण्याची गरज वाटू लागली. निर्माते डॉ. शांतीलाल गडा यांनीसुद्धा फारसे आढेवेढे न घेता टीमची जी गरज आहे ती वेळच्यावेळी भागवली होती. या चित्रपटामध्ये लहान मुलांचाही कलाकार म्हणून सहभाग आहे. त्यांनीही या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या जेवणावर ताव मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -