घरमनोरंजनसलमानच्या चित्रपटात दिसणार 'गेम ऑफ थ्रोन्स'चा 'हा' पात्र दिसणार?

सलमानच्या चित्रपटात दिसणार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा ‘हा’ पात्र दिसणार?

Subscribe

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही वेब सिरीज प्रसिद्ध झाल्यांनतर तिला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यावेब सिरिजमध्ये काम करणाऱ्या पीटर डंकनझेज (टाइरॉन लैनिस्टर) ने साकरलेल्या भूमिकेचे कौतूक जगभरात झाले. अली अब्बास यांच्या डायरेक्शनमध्ये सलमान खानचा आगामी चित्रपट भारतची शुटिंग सुरु झाली आहे. समलमान खान, प्रियांका चौप्रा आणि दिशा पटनी हे कलाकार असलेल्या चित्रपटाची शुटिंग सध्या चर्चेचा विषय बनली आहे. शुटिंग दरम्यान ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील टाइरॉन लैनिस्टर बरोबर असलेला फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्यामुळे हा नवीन कलाकार कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट मोठा प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे.

या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एशले रिबेलोने याने हा फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोखाली लिहिले की,”बघा, भारताच्या सेटवर मी कोणाबरोबर आहे. गेम सुरु झाला आहे.”

- Advertisement -

हॉलिवूडमधील यानटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटो शेअर केल्यानंतर सलमानच्या चित्रपटात आता डंकनझेज झळकणार असल्याचेही अनेकांना वाटले. मात्र असे नसून फोटो मध्ये पीटर सारखा दिसणारा व्यक्ती भारतीयच आहे. याचं नाव ताकिर मीर आहे. या फोटोचा फायदा सलमानच्या आगामी चित्रपटाला झाला आहे. चित्रपट येण्या अगोदरच याचित्रपटात काही तरी नवीन बघालया मिळणार असल्याचे लोकांना वाटत आहे.

- Advertisement -

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ‘गेम ऑफ थ्रेन्स’ मध्ये पीटरने जी भूमिका साकारली आहे तीच भूमीका या चित्रपटातही दिसणार आहे. ताकिर हा चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या सर्कस मधल्या भूमिकेत दिसणार आहे. याच बरोबर चित्रपटात सलमान २५ ते ६५ वर्षाच्या मानसाची भूमिका साकारणार आहे. शाहरुखच्या ‘फॅन’ चित्रपटानंतर आता सलमानच्या चित्रपटात ‘एज रिडक्शन’ तंत्राचा वापर केला जाणार आहे. चित्रपट १९४७ ते २०१० वर्षांदरम्यान स्टोरीवर आधारित असेल. हा चित्रपट पुढच्यावर्षी जून महिन्यात प्रसिद्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -