घरमुंबईआंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या ५६ फेऱ्या रद्द

आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या ५६ फेऱ्या रद्द

Subscribe

मराठा आरक्षण मिळावंण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी मध्य रेल्वेसह, ट्रान्सहार्बर लोकलही थांबवल्या. त्याचा परिणाम एकूणच रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला. बुधवारी दिवसभरातून एकूण ५६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ठाणे – घनसोली या स्थानकांवर आज सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांनी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक दाखल झाले होते. त्यांनी ट्रॅकवर उतरुन रेलरोको केला. जवळपास अर्धा तास ही परिस्थिती अशीच होती. त्यामुळे या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शिवाय, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणात गर्दीला सामोरं जावं लागलं. ही परिस्थिती १० वाजून २४ मिनिटांनी आटोक्यात आणली गेली. लांबपल्लाच्या मेल-एक्स्प्रेसना देखील लेटमार्क लागला.
मराठा क्रांती मोर्चाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी बंदची हाक दिली. सकाळपासून आंदोलक आक्रमक झाले. या बंदमुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. यामध्ये रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, एसटी, मेट्रो या वाहतुकीला फटका बसला. जोगेश्वरी, कल्याण, ठाणे, घनसोली या स्थानकांवरही रेले रोको आंदोलन करण्यात आलं.

पश्चिम रेल्वेवरही परिणाम

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी स्थानकात सकाळी ९.१६ वाजता आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरुन रेल रोको केला. परिणामी काही काळासाठी पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली. पण, पोलिसांनी आंदोलकांना स. ९.२४ वाजता रुळावरुन हटवल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -