घरमनोरंजनFilmfare वर झळकली 'धडक'ची जोडी

Filmfare वर झळकली ‘धडक’ची जोडी

Subscribe

फिल्मफेअर मासिकाच्या कव्हर पेजवरील ईशान-जान्हवीच्या या फोटोला, सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळते आहे.

धडक सिनेमातून बॉलीवूडमध्ये झळकलेली नवी जोडी म्हणजे जान्हवी कपूर- ईशान खट्टर. धडकच्या रिलीज झाल्यापासून आजपर्यंत या फ्रेश जोडीने कायमच लोकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी ही जोडी आज देशभरात पॉप्युलर झाली आहे. नुकताच या जोडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. जगप्रसिद्ध फिल्मफेअर मासिकाने त्यांच्या पुढील आवृत्तीच्या कव्हर पेजसाठी ईशान आणि जान्हवीची निवड केली आहे. या दोघांना घेऊन फिल्मफेअरच्या कव्हर पेजसाठीचं फोटोशूट नुकतंच पार पडलं. त्याचाच फोटो फिल्मफेअरने त्यांच्या अॉफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत, याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. फिल्मफेअर सारख्या नावाजलेल्या ब्रँडच्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान मिळाल्यामुळे ईशान आणि जान्हवी हे दोघं भलतेच खूष आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या फिल्मफेअर मासिकाच्या कव्हर पेजवर ही जोडी झळकणार आहे.

‘धडक’ ने दिली ओळख

जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट. तिच्या तुलनेत इशांत थोडा अनुभवी म्हणावा लागेल. त्यानं यापूर्वी २००५ मधील ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात बालकलाकाराचं काम केलं होतं. मोठा झाल्यानंतर त्यानं चित्रपट माध्यमाचा अनुभव येण्यासाठी ‘उडता पंजाब’ आणि ‘हाफ विडो’ या दोन चित्रपटांसाठी सहदिग्दर्शक म्हणून काम केलं. तसेच विख्यात इराणीयन दिग्दर्शक माजीद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातही त्यानं अभिनय केला आहे. मात्र धडक सिनेमाने आम्हाला खरी ओळख मिळवून दिल्याचं या दोघांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -