घरताज्या घडामोडीअहान आणि इश्की होणार विवाहबद्ध

अहान आणि इश्की होणार विवाहबद्ध

Subscribe

अहान आणि इश्कीच्या आयुष्यात वेगळे वळण

इश्क पर जोर नहीं या लोकप्रिय मालिकेत अहान आणि इश्की हे दोघे आता एकत्र येणार आहेत. मालिकेचे कथानक, त्यातील व्यक्तिरेखा आणि विशेषतः परम आणि अक्षिता यांची पडद्यावरची केमिस्ट्री यामुळे लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत आता एक सुखद वळण येणार आहे. त्या दोघांच्या आयुष्यात अनेक वळणे आणि नाट्य घडून गेल्यानंतर आता ते सुखी सहजीवनासाठी सिद्ध झाले आहेत.  मालिकेत अहानची भूमिका करणारा परम सिंह #Ishqaan या लोकांच्या लाडक्या जोडीच्या लग्नाबबात स्वतःही तितकाच उत्साहात आहे. या मालिकेला आणि आमच्या व्यक्तिरेखांना मिळत असलेले प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. हा खूप सुंदर प्रवास होता. अहान आणि इश्की यांची प्रेमकहाणी पुढच्या टप्प्यावर जावी यास चाहत्यांचे मनापासून समर्थन आहे, असे अभिनेता परम सिंह याने म्हटले आहे. (Ishq par jor nahi Ahan and Ishqi will be married)

अहान आणि इश्कीचे लग्न व्हावे अशी इच्छा असणार्‍या इश्कान फॅन्ससाठी हा प्रतिक्षेचा काळ खूप मोठा होता. पण आता ते घडणार आहे. लग्नाचा सोहळा आणि विधी यांचे शूटिंग करताना आम्हाला खूप मजा आली आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडेल. आता यापुढे कथानक आणखीन आकर्षक होऊन मनाची पकड घेईल, असे इश्कीची भूमिका करणारी अक्षिता मुद्गल म्हणाली.

- Advertisement -

हेही वाचा – ईश्वरी ही व्यक्तिरेखा माझ्या अंतःकरणाच्या खूप जवळची – सुप्रिया पिळगावकर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -