घरमनोरंजनटायगर आणि दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांनी दिली प्रतिक्रिया

टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या एका इंटरव्यूमध्ये जॅकी श्रॉफ यांना टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ते दोघं चांगले मित्र आहेत आणि त्यांनी त्या दोघांना एकत्र फिरताना पाहिलं आहे

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम लावला असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर मागील ६ वर्षाच्या नात्यानंतर दिशा आणि टायगरने ब्रेकअप केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. आता कपल म्हणून दिशा आणि टायगर एकत्र नसतील. मात्र त्यांच्या ब्रेकअपची वार्ता कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. दरम्यान, सोशल मीडियावर याबाबच चर्चा सुरू झाल्या असून चाहते ब्रेकअपबाबत प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. अशातचं आता टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एका इंटरव्यूमध्ये जॅकी श्रॉफ यांना टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ते दोघं चांगले मित्र आहेत आणि त्यांनी त्या दोघांना एकत्र फिरताना पाहिलं आहे. तसेच ते म्हणाले की, ते टायगरच्या आयुष्यात जास्त लक्ष देत नाहीत. मी त्यांना बाहेर एकत्र फिरताना पाहिलं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की, मी त्याचा प्रेमप्रकरणावर लक्ष ठेवतो. मला वाटतं की ते दोघं चांगले मित्र आहेत.

- Advertisement -

दिशासोबत चांगली बॅन्डिंग
जॅकी श्रॉफ म्हणाले की, ते दोघं त्यांच्या आयुष्यात पुढे काय करतात हे त्यांच्यावर आहे. पण दिशाची जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीसोबत चांगली बॅन्डिंग आहे.

दिशा आणि टायगरच्या ब्रेकअप मागचे कारण
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून टायगर आणि दिशाच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येत होते. परंतु ही गोष्ट कधीही त्यांनी जगजाहिर केली नाही.अजूनही त्यांनी ब्रेकअप का केला यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. परंतु आता हे दोघं आपापलं स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. टायगरच्या एका मित्राने त्यांचा ब्रेकअप झाला असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याचा मित्र म्हणाला की, टायगरने ब्रेकअपमुळे आपल्या कामामध्ये कोणताच फरक येऊ दिला नाही. तो आधीसारखाचं आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. टायगर सध्या लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.


हेही वाचा :६ वर्षाच्या नात्यानंतर दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचा झाला ब्रेकअप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -