घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररानभाज्या महोत्सवातून आदिवासी संस्कृतीचे जतन

रानभाज्या महोत्सवातून आदिवासी संस्कृतीचे जतन

Subscribe

नाशिक : रानभाज्या महोत्सवातून उत्पादक ते ग्राहक साखळी तयार होत असून या माध्यमातून आदिवासी भागातील संस्कृती समोर आणण्याचे व जतन करण्याचे महत्वाचे काम होत आहे. या महोत्सवातून विविध रानभाज्यांबरोबर महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तु एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून आदिवासी भागातील स्वयंसहायता गटांना उत्पन मिळणार असून रानभाज्यांचे संवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

आदिवासी भागात उपलब्ध होणार्‍या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सलग तीसर्‍या वर्षी नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने पंचायत समितीच्या आवारात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या रानभाज्या महोत्सवाचे बुधवार (दि.27) रोजी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आयुक्त (सेवा हमी कायदा) चित्रा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव, प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रविंद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी उपस्थित होते. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत पावसाळ्यातील रानभाज्या विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -