६ वर्षाच्या नात्यानंतर दिशा पटानी आणि टायगर श्रॉफचा झाला ब्रेकअप

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून टायगर आणि दिशाच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येत होते

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम लावला असल्याची बातमी समोर आली आहे. मागील ६ वर्षाच्या नात्यानंतर दिशा आणि टायगरने ब्रेकअप केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. आता कपल म्हणून दिशा आणि टायगर एकत्र नसतील. मात्र त्यांच्या ब्रेकअपची वार्ता कळताच त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर याबाबच चर्चा सुरू झाल्या असून चाहते ब्रेकअपबाबत प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

दिशा आणि टायगरच्या ब्रेकअप मागचे कारण
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून टायगर आणि दिशाच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येत होते. परंतु ही गोष्ट कधीही त्यांनी जगजाहिर केली नाही.

अजूनही त्यांनी ब्रेकअप का केला यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. परंतु आता हे दोघं आपापलं स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. टायगरच्या एका मित्राने त्यांचा ब्रेकअप झाला असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याचा मित्र म्हणाला की, टायगरने ब्रेकअपमुळे आपल्या कामामध्ये कोणताच फरक येऊ दिला नाही. तो आधीसारखाचं आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. टायगर सध्या लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटात दिसणार टायगर
दिशा आता ‘एक व्हिलन रिर्टन्स’ या चित्रपटात दिसणार आहे. तर टायगर श्रॉफ ‘गणपत’ आणि ‘बागी 4’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :आलिया भट्ट, पूनम पांडेनंतर उर्फी जावेदनेसुद्धा केलं रणवीरचं समर्थन