घरमनोरंजनमाऊलीमध्ये 'हा' अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

माऊलीमध्ये ‘हा’ अभिनेता दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

Subscribe

'लय भारी' रितेश देशमुखचा 'माऊली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आषाढी एकादशी दिवशी या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पोस्टरमध्ये चित्रपटातील आणखी एकाची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे.

‘लय भारी’ रितेश देशमुखचा ‘माऊली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आषाढी एकादशी दिवशी या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर चित्रपटाचा टीझर रितशने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकतंच रितशेने ट्विट करत हा टीझर शेअर केला होता. नंतर त्याने मोशन पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील आणखी एकाची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे.

खलनायकाची झलक ट्विटरवर 

‘हद्दीत राहायचं! दहशतीचं दुसरं नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय,’ असं म्हणत रितशने हा व्हिडियो ट्विट केला आहे. यात घारे डोळे आणि रागीट चेहरा दिसत आहे. आता नक्की कोण आहे यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत. हा चेहरा जितेंद्र जोशीचा असल्याची ही चर्चा आहे. कारण काल मंगळवारी जितेंद्रने एक ट्विट केलं होतं. ‘सेक्रेड गेम्सनंतर काय असा प्रश्न अनेकांनी मला विचारला. त्याच उत्तर त्यांना उद्या मिळेल.’ जितेंद्रने केलेल्या या ट्विटमुळे हा चेहरा त्याचा असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

१४ डिसेंबरला होणार प्रदर्शित  

‘माऊली’ चित्रपटात रितेश ‘लई भारी’मधील माऊलीचं पात्र साकारत असला तरी, नवा ‘माऊली’ सिनेमा लई भारीचा सिक्वेल किंवा प्रिक्वेल नाही. ‘माऊली’ हे नाव आणि पात्र वगळता या दोन्ही सिनेमांचा काहीच थेट संबंध नसल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे नवा माऊली सिनेमा लई भारीची फ्रेन्चाइजी असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात अभिनेत्री सयामी खेर रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिकेत दिसेल. फास्टर फेणे सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार माऊलीचं दिग्दर्शन करणार असून, सिनेमामध्ये अजय-अतुलचं संगीत असेल. हा चित्रपट १४ डिसेंबर रोजी संपूर्ण माराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा : लयभारी म्हणत रितेशच्या ‘माऊली’चं पोस्टर रिलीज

- Advertisement -

वाचा : ‘माझी पंढरीची माय’ हे रितेशचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

वाचा : ‘माऊली’ मधील रितेशचा फर्स्ट लूक रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -