घरदेश-विदेशमग अमित शहांना सुद्धा बिर्याणी पाठवून देतो - ओवैसी

मग अमित शहांना सुद्धा बिर्याणी पाठवून देतो – ओवैसी

Subscribe

तेलंगणामधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथल्या प्रचार सभांमध्ये रोज नवनवीन मुद्दे गाजत असतानाच आता एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राजकारणात बिर्याणी आणली आहे.

अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेचा धुरळा उडवून देणारे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्या करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यावेळी त्यांने भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनाच टार्गेट केलं आहे. ‘जर अमित शहांना बिर्याणी इतकी आवडत असेल, तर त्यांना पण एक कल्याणी बिर्याणीचं पार्सल पाठवून द्यायला सांगतो’, असं ओवैसी म्हणाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री क. चंद्रशेखर राव यांच्या कथित ‘बिर्याणी वाटपा’वरून अमित शहांनी टीका केल्यानंतर त्यावर ओवैसींनी वरील वक्तव्य केलं आहे.

कोण कुणाला देतंय बिर्याणी?

तेलंगणामध्ये येत्या डिसेंबर महिन्यामध्ये दुसऱ्यांदा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या तेलंगणामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. याच दरम्यान एका प्रतिक्रियेमध्ये अमित शाह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री क. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली होती. ‘चंद्रशेखर राव राज्यातल्या मुस्लीम मतदारांना बिर्याणी पाठवतात, हे कितपत योग्य आहे?’ अशा प्रकारचा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेताना २७ नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या कुकटपल्ली परिसरामध्ये आयोजित केलेल्या एका सभेमध्ये असदुद्दीन ओवैसींनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

‘दुसरे बिर्याणी खातात, तुमच्या पोटात का दुखतं?’

यावेळी अमित शाह यांच्याविषयी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी बिर्याणीचा मुद्दा काढला. ‘दुसरं कुणी बिर्याणी खात असेल, तर तुमच्या पोटात का दुखतं? अमित शाह यांना बिर्याणी एवढी आवडते हे मला माहितीच नव्हतं. मी लगेच चंद्रशेखर राव यांना फोन करून सांगतो की अमित शाह यांना किमान कल्याणी बिर्याणी पाठवून द्या!’, असा टोला ओवैसी यांनी लगावला.

काय आहे कल्याणी बिर्याणी?

कल्याणी बिर्याणी हा जुन्या हैदराबादमध्ये प्रसिद्ध असलेला एक बिर्याणीचा प्रकार आहे. तिला ‘गरिबांची हैदराबादी बिर्याणी’ असं देखील म्हटलं जातं. बीफच्या मटणापासून ती बनवली जाते.

मोदींनी पाकिस्तानात जाऊन काय खाल्लं?’

दरम्यान, यावेळी ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्यांच्या मुलीच्या लग्नात हजेरी देखील लावली. कुणाला माहीत, तुम्ही तिथे लग्नात काय खाल्लं?’ अशा शब्दांत ओवैसींनी मोदींना टोला लगावला आहे.

- Advertisement -

८ डिसेंबरला तेलंगणामध्ये निवडणुका

तेलंगणामध्ये येत्या ८ डिसेंबरला मतदान होणार असून ही तेलंगणा राज्यात स्थापनेनंतरची दुसरी निवडणूक असणार आहे. पहिल्या निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती अर्थात टीआरएस पक्षाने प्रमुख स्थान मिळवलं होतं. त्या आधारावर चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, टर्म पूर्ण होण्याच्या ९ महिने आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ते राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहात होते.


हेही वाचा – मोदी सरकारने ताजमहल बनवून दाखवावा – ओवेसी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -