घरक्रीडाजोकोविच विक्रमी सातव्यांदा ऑसी चॅम्प

जोकोविच विक्रमी सातव्यांदा ऑसी चॅम्प

Subscribe

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने राफेल नदालचा ६-३, ६-२, ६-३ असा पराभव करत विक्रमी सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या किताबावर आपले नाव कोरले. जोकोविचने या सामन्यात नदालची पाच वेळा सर्विस मोडत तर नदालला आपली सर्विस मोडण्याची केवळ एकदाच संधी दिली. त्यामुळे त्याने आपली १५ वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. तसेच त्याने ही सलग तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने मागील वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांचे जेतेपद पटकावले होते.

नदालविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविचने अप्रतिम खेळ केला. त्याने पहिल्या सेटमध्ये २ वेळा नदालची सर्विस मोडत हा सेट ६-३ असा जिंकला. यानंतर नदाल पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र जोकोविचने त्याला सामना जिंकण्याची संधीच दिली नाही. त्याने पुढील दोन सेट ६-२, ६-३ असे सहजपणे जिंकत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

- Advertisement -

या सामन्यानंतर भावुक झालेला जोकोविच म्हणाला, माझा मागील १२ महिन्यांचा प्रवास खूप चढ-उतारांनी भरलेला होता. नदालप्रमाणेच माझी शस्त्रक्रिया झाली होती. आता मी ही स्पर्धा जिंकलो आहे आणि मागील तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धा मी जिंकलो आहे, हे खूपच अविश्वसनीय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -