घरताज्या घडामोडीआता सुशांतवर येणार बायोपिक, 'हा' अभिनेता करणार निर्मीती!

आता सुशांतवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता करणार निर्मीती!

Subscribe

रविवारी  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली. नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सुशांतने महेंद्र सिंह धोनीवर आधारीत बायोपिकमध्ये काम केले. पण आता सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आयुष्यावर अभिनेता कमाल आर. खान एक चित्रपट तयार करणार आहे. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना या चित्रपटाद्वारे तो एक्सपोज करणार आहे. असे कमाल खानने म्हटले आहे.

- Advertisement -

कमाल खानेन ट्विट करत ही माहिती दिली, “सुशांत सिंह राजपुतवर मी लवकरच एक बायोपिक तयार करणार आहे. सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना मी या चित्रपटाद्वारे जगासमोर आणणार आहे. मी बॉलिवूडचा द्वेष करतो. सुशांतला न्याय मिळायलाच पाहिजे.” असे कमाल खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

बॉलिवूडमधील घराणेशाहीवर वारंवार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कमालचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -