घरमनोरंजन'ही' अभिनेत्री अयोध्याविषयावरील पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणार

‘ही’ अभिनेत्री अयोध्याविषयावरील पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणार

Subscribe

या नव्या प्रोडक्शन हाऊस चे नाव मणिकर्णिका असून या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट रामजन्मभूमी आणि अयोध्याविषयावर आधारलेला असणार

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत चित्रपटात अभिनय केल्यानंतर आता चित्रपटांची निर्मिती करणार आहे. मणिकर्णिका अभिनेत्री कंगनाने आपल्या प्रोडक्शन हाऊसची सुरूवात केली असून या माध्यमातून लवकरच चित्रपटांची निर्मिती करणार आहे. या नव्या प्रोडक्शन हाऊस चे नाव मणिकर्णिका असून या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट रामजन्मभूमी आणि अयोध्याविषयावर आधारलेला असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अपराजिता अयोध्या’ असे असणार आहे.

- Advertisement -

कंगना तिच्या या प्रोडक्शन हाऊसमधून अयोध्या विषयावर आधारलेला चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती कंगनाची बहिण रंगोलीने ट्विट करत दिली आहे. या चित्रपटाची शुटिंग पुढच्या वर्षी सुरू करणार असून राम जन्मभूमीचे प्रकरण तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आधारलेल्या या चित्रपटाची स्टार कास्ट निवड लवकरच करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्या निकालानंतर कंगनाने हिंदू-मुस्लिम या धर्माच्या ऐक्यासंदर्भात एक ट्विट देखील केले होते.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना असे म्हणाली की, ‘रामजन्मभूमीचा वाद अनेक वर्षापासून चर्चेत होता. १९८० साली जन्माला आलेलं मुल अयोध्याचे नकारात्मक नाव ऐकून मोठा झाला असेल. मात्र अयोध्येच्या निकालानंतर भारतीय राजकारणाचा चेहरा बदलला आहे.’

दरम्यान, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘थलाइवी’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. जयललिता या १४ वर्ष तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. या बायोपिकमध्ये जयललिता यांची मुख्य भूमिका कंगना रणौतनं साकारली आहे. चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्या नंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केले आहे.


हेही वाचा – जयललितांच्या जीवनावरील ‘थलाइवी’ चित्रपटाचा टीजरमुळे कंगना झाली ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -