घरमुंबई'अजित पवार जो व्हीप काढतील तो राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होईल'

‘अजित पवार जो व्हीप काढतील तो राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होईल’

Subscribe

राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांचे गटनेतेपद काढून टाकण्यात आले. यावर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला. या संबंधी भाजपचे नेता रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांना अजूनही गटनेतेपदाचे अधिकार असल्याचे सांगितले.

काय म्हणाले रावसाहेब दानवे

  • राज्यपालांनी सुरुवातीला भाजपला सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले
  • भाजप हे सरकार बनवू शकत नाही असे राज्यपालना सांगितले
  • त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिले पण कोणीही सत्तास्थापन केले नाही
  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली
  • राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला. मात्र त्यावेळी राज्यपालांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना मदत केल
  • आज आकडेवारीची जुळवाजुळव करून राष्ट्रवादी आणि भाजपने सरकार स्थापन केले
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
  • राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्याचे निवेदन पाहून निर्णय घेतला
  • त्यामुळे राज्यपालांनी नियमांची कोणतीही पायम्मली केलेली नाही
  • अजित पवार यांनी पाठिंब्याचे पत्र दिले तेव्हा अजित पवार गटनेते होते
  • जरी अजित पवार यांना गटनेते पदावरून काढलं, असे सांगत असले तरी अजित पवार जो व्हीप काढतील तो राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होईल
  • शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे
  • रोज हॉटेल का बदलत आहेत, हे अजून कळलं नाही
  • राज्यात शेतकरी अडचणीत असताना काँग्रेस-शिवसेना रोज हॉटेल्स बदलून आमच्यावर बेछूट आरोप करत आहे
  • एकीकडे आमचे आमदार आज आपापल्या मतदारसंघात शेतकऱ्यांसोबत आहेत
  • संजय राऊत यांना सत्ता येण्याआधीच वेड लागले आहे
  • त्यांना आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायची वेळ आली आहे

हेही वाचा –

भाजपशी हातमिळवणी करताच अजित पवारांना ९ प्रकरणात क्लीन चीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -