घरमनोरंजनकरण आणि द्रिशा जंगल सफारीवर

करण आणि द्रिशा जंगल सफारीवर

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल काही दिवसांपूर्वीच द्रिशा आचार्यसोबत विवाह बंधनात अडकला. 18 जून रोजी मुंबईतील एका ग्रँड हॉटेलमध्ये त्यांचा विवाह धुमधड्यात संपन्न झाला. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान, आता लग्नानंतर ही जोडी हनीमूनला गेली आहे. मनालीमध्ये फॅमिली ट्रीपनंतर द्रिशा आणि करण हनीमूनसाठी रवाना झाले आहेत.

करण आणि द्रिशा केनियामध्ये पोहोचले हनीमूनला

करण देओल हनिमून, द्रिशा आचार्य

- Advertisement -

करण देओल हनिमून, द्रिशा आचार्य

 

- Advertisement -

करण आणि द्रिशा हनीमूनसाठी केनियाला गेले आहेत. ज्यादरम्यानचे अनेक फोटो करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंवरुन दिसून येतय की, दोघांची हा हनीमून अॅडव्हेंचर ट्रिप आहे.

करण देओल हनिमून, द्रिशा आचार्य

 

जिथे हे दोघं जंगल सफारी करताना दिसत आहेत. केनियातील मसाई माराचे हे जंगल जंगली प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. जिथे हत्ती, सिंह, जिराफ, पाणघोडे आणि इतर अनेक प्रजाती दिसतात.

करण-द्रिशाचं पंजाबी परंपरेनुसार पार पडलं लग्न

करण देओलचा लग्नसोहळा लग्न मुंबईतील Taj Lands या 5 स्टार हॉटेलमध्ये झाला. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे आणि टॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते. यात स्पेशल गेस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेता सलमान खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करण जौहर देखील सहभागी झाले होते.


हेही वाचा :

आजारपणामुळे समंथा घेणार करिअरमधून ब्रेक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -