घरठाणेआव्हाडांच्या कळव्यात अजितदादांचे शुभेच्छा फलक; मुल्ला समर्थकांची बॅनरबाजी

आव्हाडांच्या कळव्यात अजितदादांचे शुभेच्छा फलक; मुल्ला समर्थकांची बॅनरबाजी

Subscribe

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत शिंदे-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र बॅनरबाजीला ऊत आला आहे. ठाण्यामध्ये ‘राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचीच’ असे बॅनर विरोध पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावासह झळकले. तर आता, जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेला कळव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शभेच्छा देणारे फलक झळकले आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना भाजपाने खिंडार पाडले. या दोन्ही पक्षांतील बंडखोरांना सत्तेत भागीदार करून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जो फुल आहे, तोसुद्धा ‘डाऊटफुल’… ठाकरे गटाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शरसंधान

ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कॅडबरी सिग्नल येथे सोमवारी ‘राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचीच’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्या बॅनरवर शरद पवार यांच्या छायाचित्रासह ‘आले किती गेले किती, त्याची कोणाला भीती’ अशी ओळ मोठ्या अक्षरांत पाहायला मिळते. या बॅनरवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवनियुक्त ठाणे शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचीही नावे आहेत. यावरून हे बॅनर आव्हाड यांच्या समर्थकांनी लावल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसऱ्या एका बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कळवा असा उल्लेख असून माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. ‘आम्ही सर्व शरद पवार साहेबांसोबतच, आमच्या नावाचा कोणीही गैरवापर करू नये,’ असे त्यावर नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

तर आता बुधवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरातील कॅडबरी नाक्यावर माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. या फलकांवर शरद पवार यांचेही छायाचित्र आहे. याशिवाय माजी खासदार आनंद परांजपे यांचेही छायाचित्र लावण्यात आले आहे.

ठाणे शासकीय विश्रामगृहासमोर सोमवारी मुल्ला समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवून अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद साजरा केला होता. तसेच जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करत, त्यांचे बॅनर पायाखाली तुडवले होते. त्यानंतर मुल्ला समर्थकांनी थेट आव्हाड यांच्या मतदारसंघात बुधवारी हे फलक लावले आहे. त्यावर मुल्ला समर्थक मोहसिन शेख, तकी चेऊलकर आणि इतर तिघांच्या नावांसह छायाचित्रे आहेत. याशिवाय शरद पवार यांनी फोटो लावल्यास विरोध केल्यानंतर ही शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप कोळसे- पाटील, सुनील तटकरे आणि नजीब मुल्ला यांचे देखील फोटो आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -