घरमनोरंजनकार्तिक आर्यनच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट,दिग्दर्शक समीर विद्वांस सोबत दिसणार कार्तिक!

कार्तिक आर्यनच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट,दिग्दर्शक समीर विद्वांस सोबत दिसणार कार्तिक!

Subscribe

कार्तिकच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. लवकरच कार्तिक मराठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची चर्चा सध्या सगळीकडे रंगताना दिसत आहे. बिग बजेट चित्रपट दोस्ताना 2 मधून कार्तिक ची एक्जिट झाल्यानंतर कार्तिकच्या चाहत्यांमध्ये तसेच हितचिंतकांमध्ये अनेक प्रकारे रोष प्रकट होऊ लागला होता. अनेकांनी कार्तिकची बाजू घेत त्याला सपोर्ट करत नेपोटीझम बद्दल आवाज चढवला. पण आता कार्तिकच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. लवकरच कार्तिक मराठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या चित्रपटात दिसणार आहे.समीर विद्वांस यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार कामगिरी केली असून ‘आनंदी गोपाळ’ सारख्या चित्रपटांकरिता त्यांना नॅशनल अवॉर्ड देखील प्राप्त झाला आहे. आता दिग्दर्शक समीर विद्वांस बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याची महती समोर आली आहे. सूत्रांनुसार हा एक लव्ह स्टोरी बेस सिनेमा असणार आहे तसेच अभिनेता कार्तिक आर्यनची यात वर्णी लागणार आहे. सध्या चित्रपट प्री- प्रॉडक्शनच्या स्टेजवर आहे. अद्याप चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असणार याची माहिती देण्यात आली नाहीये. पुढील वर्षी चित्रपटाची चित्रीकरण सुरू होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. चित्रपटाबद्दल अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. सध्या दिग्दर्शक समीर विद्वांस क्रांतिसूर्य आणि क्रांतिज्योती हे दोन्ही बायोपिक सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

अभिनेता कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास कार्तिक आर्यन नेटफ्लिस च्या आगामी वेब सीरिज ‘धमाका’ मध्ये दिसणार आहे.


हे हि वाचा – पहिल्यांदा पती-पत्नी सारखे राहिलो, निना गुप्ताने शेअर केला लॉकडाऊनचा अनुभव

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -