घरमनोरंजनकेबीसीचे स्पर्धक मलाही प्रेरीत करतात - अमिताभ बच्चन

केबीसीचे स्पर्धक मलाही प्रेरीत करतात – अमिताभ बच्चन

Subscribe

कौन बनेगा करोडपती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या सोमवारपासून हा शो सुरू होणार असून याचे सूत्रसंचालन महानायक अमिताभ बच्चन करणार आहेत.

सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करणारा, हॉटवर बसवून करोडपती बनणारा आणि महानायक अभिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायची संधी देणारा छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ये गेम शोला भारतात यंदा १८ वर्ष पूर्ण होत आहेत. सोनी वाहिनीवर येत्या सोमवारी, ३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता सुरू होणाऱ्या या शोचे यंदाचे १० वे सीजन आहे. या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन करणार आहेत.

कबतकरोकोगेच्या गाण्यातून समाज प्रबोधन

देशाला ज्ञानाचे मूल्य समजावून देणाऱ्या हा शो पहिल्यांदा २००० साली छोट्या पडद्यावर सुरू झाला होता. यावेळी हा शो १० वा सीजन घेऊन येत आहे. दरम्यान, नेहमी वेगवेगळा सामाजिक संदेश घेऊन येणाऱ्या कौन बनेगा करोडपती (केबीसी) मध्ये यंदा #कबतकरोकोगे ही टॅग लाईन देणात आली आहे. त्यामुळे सामाजिक समस्यांचे भान ठेऊन कुठे तरी त्याला पूर्णविराम देऊन प्रगतीपथाचा मार्ग कधीपर्यंत अडवून ठेवाल, असे या माध्यमातून सांगितले जात आहे. या टॅग लाईनवर एक गाण बनवण्यात आलं असून हे गाणं स्वतः अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आले आहे.

- Advertisement -

ठराविक एपिसोडचाच शो 

यंदाच्या शोचे ६० एपिसोड दाखवण्यात येणार असल्याचे सांगितले जात असून सोमवार ते शुक्रवार हा केबीसी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वेळी शुक्रवारचा एपिसोड रिअल हिरोजसोबत असणार असून त्याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असणार आहे. यावेळी १५ दिवसात तब्बल ३१ मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी केबीसीसाठी नोंदणी केली आहे. यंदाही 50:50, ऑडियन्स पोल आणि जोडीदार या लोकांच्या आवडत्या लाइफलाइन जशाच्या तशा ठेवण्यात आल्या असून यंदाच्या वर्षी ‘आस्क द एक्स्पर्ट’ ही लाइफलाइन पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये एक तज्ज्ञ व्हिडिओ कॉलमार्फत स्पर्धकासाठी उपलब्ध असेल आणि तो स्पर्धकाला अचूक उत्तर देण्यासाठी मदत करेल. नुकतेच या रिअॅलिटी शोचा प्रोमो दाखवण्यात आला असून यावेळी सोनी पिक्चर्स नेटवर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी सिंह, वाहिनीचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड दानिश खान, एसव्हीपी आणि सीनियर क्रिएटिव्ह डायरेक्टर – प्रोग्रामिंग आशीष गोलवलकर, कन्सल्टंट – बिग सिनर्जी सिद्धार्थ बसू आणि स्वतः अभिनेसा आणि शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यावेळी उपस्थित होते.

“माझा केबीसी सोबतचा प्रवास हा अनेक अर्थांनी मला समृद्ध करणारा होता. वर्षामागून वर्षे मी उत्सुकतेने केबीसीच्या स्पर्धकांना भेटत असतो. हे स्पर्धक आयुष्यात काही तरी भव्य दिव्य साध्य करण्यासाठी आपले स्वप्न साकार करण्याच्या अपेक्षेने आलेले असतात. त्यापैकी खूप कमी जण हॉट सीटपर्यंत पोहोचू शकतात किंवा खूप मोठी रक्कम जिंकू शकतात. पण ते मला बदल्यात खूप काही देऊन जातात. ते मला हसतमुखाने नवीन दिवसाला सामोरे जाण्याचे आणि नवीन आरंभ करण्याचे सामर्थ्य देतात. प्रत्येक स्पर्धक मला प्रेरित करतो आणि या अनुभवाबद्दल मी कृतज्ञ आहे.”
– अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -