घरताज्या घडामोडी‘KBC13’च्या खास दीपावली सप्ताह, अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी हॉटसीटवर...

‘KBC13’च्या खास दीपावली सप्ताह, अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी हॉटसीटवर दिसणार

Subscribe

अमिताभ बच्चनसोबत हे तिन्ही पाहुणे कलाकार प्रेक्षकांना मस्ती, मनोरंजन, हास्यविनोद, आणि खेळाच्या सफरीवर घेऊन जाणार आहेत

‘कौन बनेगा करोडपती’ सिझन १३ मध्ये १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान खास दीपावली सप्ताह पार पडणार आहे. या शोचा सेट दिव्यांनी उजळून निघणार असून, रांगोळ्यांनी सुशोभित होणार आहे. बिग बी सगळ्या पाहुण्यांच्या आणि प्रेक्षकांच्या समवेत मोठ्या उत्साहाने आणि उल्हासाने दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. शानदार शुक्रवारच्या भागात  अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी हे तिन्ही पाहुणे हॉटसीटवर विराजमान होतील आणि होस्ट अमिताभ बच्चन समवेत हा खेळ खेळताना दिसतील. येत्या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ १३ च्या शानदार शुक्रवारच्या खास भागात अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी येणार आहेत.

- Advertisement -

हा खेळ खेळण्याशिवाय अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी या शोमध्ये अनेक गंमती-जमती करताना दिसतील. कतरिना कैफ सूर्यवंशीचा सेट साफ करतानाचा व्हिडिओ, अमिताभ बच्चन आणि कतरिना यांचा ‘टिप टिप बरसा पानी’ वरील डान्स, चित्रपटात येण्याआधीचा अक्षय कुमारचा संघर्ष आणि याराना चित्रपटातील ‘सारा जमाना’ गाण्यावरील त्याचा डान्स अशा बर्‍याच गंमतीजमती या शानदार शुक्रवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


अमिताभ बच्चनसोबत हे तिन्ही पाहुणे कलाकार प्रेक्षकांना मस्ती, मनोरंजन, हास्यविनोद, आणि खेळाच्या सफरीवर घेऊन जाणार आहेत आणि कार्यक्रम रंगतदार करणार आहेत. या क्षेत्रातील कामगिरीबद्दल अमिताभ बच्चन अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ या तिघांचे तोंड भरून कौतुक करताना दिसतील. इतकेच नाही, तर रोहित शेट्टींनी आपल्या आईसाठी लिहीलेल्या ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांनी सही करावी अशी रोहित शेट्टी बिग बी यांना विनंती करताना दिसतील तसेच  बच्चन यांच्याशी आपल्या वडिलांच्या खास नात्याबद्दलही काही गोष्टी सांगतील. या खेळातून जिंकलेली रक्कम अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी ‘भारत के वीर’ या सरकारी वेबसाइटला दान करतील, जी वेबसाइट देशाची सेवा करताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करते.

- Advertisement -

हे ही वाचा – Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात बोल्ड अन् ग्लॅमरस निथा शेट्टीची एंट्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -