घरताज्या घडामोडीBigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात बोल्ड अन् ग्लॅमरस निथा शेट्टीची एंट्री

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात बोल्ड अन् ग्लॅमरस निथा शेट्टीची एंट्री

Subscribe

'गंती बात ४' या वेबसीरीजमध्ये निथा बोल्ड अवतारात दिसली होती

बिग बॉस मराठी ३च्या घरात नुकतेच ४० पूर्ण झाले आहेत.यावेळी अभिनेता आविष्कार दार्व्हेकर घरातून बाहेर गेला आणि बिग बॉसच्या घरात दुसऱ्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री झाली आहे. हॉट अँन्ड ग्लॅमरस अभिनेत्री निथा शेट्टी साळवी बिग बॉसच्या घरात आली आहे. निथाने बिग बॉसच्या घरात एंट्री करताच घरातील स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निथा शेट्टीचा ग्लमरस आणि बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांनाही दणाणून सोडले. निथाच्या एंट्रीने बिग बॉसचं घर एका रंजक वळणावर येऊन ठेपले आहे. निथाने बॉग बॉसच्या मंचावर जबरदस्त डान्स सादर करुन बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी निथाचे स्वागत केले.

- Advertisement -

आदिश वैद्यनंतर निथा शेट्टी ही दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात आली आहे. आदिशकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या मात्र आदिश दुसऱ्या आठवड्यातच घराबाहेर गेला. त्यामुळे दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक बिग बॉसच्या घरात काय रंगत आणणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. निथाने बिग बॉसच्या घरात येताना सर्व स्पर्धकांसाठी खास दिवाळी गिफ्ट आणले होते. तिने प्रत्येकाला फटाक्याच्या वैशिष्ट्यांप्रमाणे घरातील सदस्य ओळखून त्याला फटाके गिफ्ट केले. निथाची घरात एंट्री झाली आणि आविष्कार घरातून बाहेर गेल्याने सर्वांनाच दु:ख झाले.

- Advertisement -

निथाच्या फ्रंट वर्कबाबत बोलायचे झाले तर निथाने हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीत काम केले आहे. निथाने आतापर्यंत २९ हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तर ४ सिनेमात निथा दिसली होती. ‘गंती बात ४’ या वेबसीरीजमध्ये निथा बोल्ड अवतारात दिसली होती. गंदी बात या सीरीजमुळे निथाला ग्लमर आणि खरी ओळख मिळाली. त्याचप्रमाणे निथाने ‘तेनाली रमण’, ‘घर की लक्ष्मी बेटीयाँ’, ‘परावतार श्री कृष्ण’, अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. प्रत्येक मालिकेत ती अगदी साध्या आणि सोज्वळ रुपात प्रेक्षकांना दिसली आहे. निथा आता बिग बॉसच्या घरात कसा गेम खेळणार? काय रंगत आणणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – आयुष्मान खुराना-रकुल प्रीत सिंग फेम ‘डॉक्टर जी’ प्रेक्षकांच्या भेटीला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -