घरमनोरंजनपनामा पेपर लीक प्रकरणी बिग बींनी ऐश्वर्यावरील आरोपांचा केला खुलासा

पनामा पेपर लीक प्रकरणी बिग बींनी ऐश्वर्यावरील आरोपांचा केला खुलासा

Subscribe

पनामा पेपर लीक प्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची सोमवारी जवळपास ५ तास चौकशी केली. या प्रकरणात आतापर्यंत जगभरातील अनेक बडे उद्योजक, नेते, सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. या सर्वांवर काळा पैसा परदेशात लपवून ठेवत कर चुकवेगिरी केल्याचे आरोप आहेत. यात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचाही समावेश आहे. यामुळे ईडीने सोमवारी ऐश्वर्याची चौकशी केली आहे. यापूर्वी ऐश्वर्या रायचा पती अभिनेता अभिषेक बच्चन आणि सासरे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचेही नाव समोर आले आहे. मात्र त्यांनी अनेकदा प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र ऐश्वर्या पाठोपाठ आता अभिषेक बच्चनचीही पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

पनामा पेपर लीक प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सोमवारी ऐश्वर्याची जवळपास ५ तास चौकशी केली. याप्रकरणी दाखल गुन्हासंदर्भात ऐश्वर्याची ईडीने चौकशी केली. ईडीच्या समन्सला उत्तर देत ऐश्वर्याने काल दिल्लीतील ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावेळी ईडीने विचारलेल्या अनेक प्रश्नांना तिने उत्तर दिली.

- Advertisement -

पनामा पेपर्समधून उघड झाले की, काळा पैसा लपवण्यासाठी ऐश्वर्याने कथित ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमध्ये २००५ मध्ये अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने एक बनावट कंपनी सुरु केली होती. या कंपनीची संचालक ऐश्वर्या राय होती. ऐश्वर्याशिवाय या कंपनीच्या डायरेक्टर पदावर तिचे आई, वडील आणि भाऊ देखील होते.

पनामा पेपर्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले होते. यावेळी बिग बींनी परदेशात काळा पैसा लपवल्याचे आरोप फेटाळले होते. यावर बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, मी देशाच्या कायद्याचा आदर करतो, मात्र पनामा पेपर लीक प्रकरणातील अहवालात दावा केलेल्या कोणत्याही कंपनीचा मी संचालक नाही. भारत सरकार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात माझे नाव का घेतले जातेय. हे मला सुद्धा जाणून घ्यायचे आहे. मी नियमानुसार सर्व कर भरतोय. असं बिग बी म्हणाले होते.

- Advertisement -

पनामा पेपर्स लीक प्रकरणात समोर आलेल्या कंपन्यांमधील चार कंपन्यांचे मालक अभिनेते अमिताभ बच्चन असल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन कंपन्या या बहामासमधील होत्या. तर एक कंपनी ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत आहे. पनामा पेपर्समध्ये या बनावट कंपन्यांचे भांडवल काही हजार डॉलर्स होते तर व्यवसाय लाखो डॉलर्सचा होता. या प्रकरणी यापूर्वी ईडीने अभिषेक बच्चनची देखील चौकशी केली होती.


Omicron variant : ख्रिसमस सेलिब्रेशन पुढे ढकला, सुट्टीचे प्लॅन रद्द करा; WHO ने दिला सल्ला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -