घरमनोरंजनमुलाच्या जाण्याचे दुःख असह्य; सुशांतच्या वडिलांची प्रकृती बिघडली

मुलाच्या जाण्याचे दुःख असह्य; सुशांतच्या वडिलांची प्रकृती बिघडली

Subscribe

तब्येत अचानक बिघडल्याने त्वरित सुशांतचे वडील एका कुटुंबातील सदस्यासह फ्लाईटने पटनाला रवाना

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचे वडील के के सिंह यांची मंगळवारी सकाळी अचानक प्रकृती अचानक खराब झाली. ते बेशुद्ध झाले आणि त्यानंतर त्यांना पटना येथे रवाना करण्यात आले. तब्येत अचानक बिघडल्याने त्वरित सुशांतचे वडील कुटुंबातील एका सदस्यासह फ्लाईटने पटनाला रवाना झाले. अशा परिस्थितीत मुंबई येथे होणारी सुशांतची शोकसभा देखील रद्द करण्यात आली आहे.

ज्यावेळी सुशांतने आत्महत्या केली, असा फोन पोलिसांकडून सुशांतच्या वडिलांना गेला, त्यावेळीच सुशांतचे वडील के के सिंग यांच्या पायाखालची जमिन सरकली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना सुशांतच्या जाण्याने विश्वास बसला नाही आणि ते त्या धक्क्यातून लवकर सावरू शकले नाही. सुशांतच्या अशा अचानक जाण्याचे दुःख त्यांना असह्य झाले आणि आज त्यांनी प्रकृती ढासळ्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

सुशांतने १४ जून रोजी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या अखेरच्या भेटीसाठी बॉलिवूड कलाकार तेथे दाखल झाले. त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूर, कृती सॅनॉन आणि सर्व बॉलिवूडसह टेलिव्हिजन कलाकार सुशांतच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त २० लोकं हजर राहण्याची परवानगी होती. दरम्यान, जेथे अंत्य विधीची प्रक्रिया सुरू होती तेथे फक्त हे २० लोकं हजर होते. तर सुशांतचे बरेच मित्र स्मशानभूमी बाहेर हजर होते.

सुशांतच्या वहिनीचा ही डिप्रेशनमध्ये झाला मृत्यू

दरम्यान, सुशांतच्या या अशा अचानक जाण्याचा धक्का सहन न झाल्यामुळे सोमवारी त्याच्या चुलत वहिनीचेही निधन झालं आहे. सोमवारी सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त मिळाल्यानंतर बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील वडिलोपार्जित गावात राहणाऱ्या सुधा देवी यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्णिया जिल्ह्यातील मालडीहा हे सुशांतसिंग राजपूत यांचे मूळ गाव. सुशांतच्या आत्महत्येची बातमी गावात पोहोचताच त्याची चुलत वहिनी सुधा देवी यांना धक्का बसला. आणि तीही डिप्रेशनमध्ये गेली. तीने खाणेपिणे बंद केले. इकडे,  सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार केले जात होते, तिथे सुधा देवीच्या मृत्यूची बातमी आली.


सुशांतला ऐकू येत होते विचित्र आवाज; लेखिकेने केला खळबळजनक खुलासा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -