घरताज्या घडामोडीसुशांतची आत्महत्या वहिनीला सहन झाली नाही, डिप्रेशनमध्ये झाला मृत्यू!

सुशांतची आत्महत्या वहिनीला सहन झाली नाही, डिप्रेशनमध्ये झाला मृत्यू!

Subscribe

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने  संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. सुशांतच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. कुटुंबीय तर अद्याप या घटनेमुळे सावरलेलं नाहीये. सुशांतच्या या अशा अचानक जाण्याचा धक्का सहन न झाल्यामुळे सोमवारी त्याच्या चुलत वहिनीचेही निधन झालं आहे. सोमवारी सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त मिळाल्यानंतर बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील वडिलोपार्जित गावात राहणाऱ्या सुधा देवी यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पूर्णिया जिल्ह्यातील मालडीहा हे सुशांतसिंग राजपूत यांचे मूळ गाव. सुशांतच्या आत्महत्येची बातमी गावात पोहोचताच त्याची चुलत  वहिनी सुधा देवी यांना धक्का बसला. आणि तीही डिप्रेशनमध्ये गेली. तीने खाणेपिणे बंद केले. इकडे,  सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार केले जात होते, तिथे सुधा देवीच्या मृत्यूची बातमी आली.

- Advertisement -

सुशांतचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून सोमवारी दुपारी ४ वाजता अंत्यविधीसाठी पार्ल्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथून सुशांतचे वडील सोमवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. सुशांतने वांद्रे येथील ज्या घरात आत्महत्या केली तिथे ते गेले. त्यांनतर कूपर हॉस्पिलटमध्ये आले. सुशांतचे वडील, दोन बहिणी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, गायक उदित नारायण यांच्यासह काही मित्र परिवार स्मशानभूमीत त्याच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी होती. पार्ल्यातील सेवा समाज स्मशानभूमीत सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी त्याचे काही मित्र घरातच होते. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून त्याच्या मित्रांची तसेच सिनेक्षेत्रातील काही लोकांची चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – सुशांतला ऐकू येत होते विचित्र आवाज; लेखिकेने केला खळबळजनक खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -