घरमनोरंजनसुशांतला ऐकू येत होते विचित्र आवाज; लेखिकेने केला खळबळजनक खुलासा

सुशांतला ऐकू येत होते विचित्र आवाज; लेखिकेने केला खळबळजनक खुलासा

Subscribe

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्या आत्महत्येवरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. बॉलीवूड जगतातील अनेक मंडळींनी समोर येऊन सोशल मीडियावर व्यक्त होत भाष्य केले आहे. सुशांत हा नैराशाच्या गर्तेत होता. गेले सहा महिने तो मानसिक आजारावर उपचार घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या मानसिक अस्थिरतेवर खळबळजनक खुलासा एका लेखिकेने केला आहे. सुशांतला चित्र विचित्र आवाज ऐकू येत होते. त्याला आभास होत होते. त्यामुळेच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती त्याच्यापासून दूर गेली असल्याचे या लेखिकेने म्हटले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांच्या सहकारी लेखिका सुऱ्हिता सेनगुप्ता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत यावरच बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुऱ्हिता सेनगुप्ता

सडक २ मध्ये भूमिका मिळावी म्हणून सुशांत महेश भट यांना भेटायला आला होता. त्या दोघांमध्ये लगेचच गप्पा सुरू झाल्या. सुशांत एक चांगला गप्पा मारणारा व्यक्ती होता. जगातील कुठल्याही विषयावर बोलू शकायचा. अगदी क्वांटम फिजिक्सपासून ते सिनेमापर्यंत, कशावरही तो बोलायचा. या गप्पांमध्ये महेश भट यांना सुशांतच्या अवस्थेचा अंदाज आला होता. त्यांना त्याची अवस्था परवीन बाबीसारखी झाल्यासारखी वाटली. महेश भट यांनी ती अवस्था पाहिली होती. त्यांना माहित होतं की यावर औषध गोळ्यांशिवाय इतर कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाही. सुशांतची ही अवस्था माहिती असतानाही त्याची गर्लफ्रेंड रिया त्याच्यासोबत राहत होती. त्याने औषधे घ्यावीत म्हणून तिने पूर्ण प्रयत्न केले. पण तो नकार द्यायचा. गेल्या वर्षभरात सुशांतने स्वतःला जगापासून वेगळे करून घेतले होते. रिया जोपर्यंत सर्व परिस्थिती सहन करू शकत होती, तोपर्यंत त्याच्यासोबत राहिली. सुशांतला आवाज ऐकू येऊ लागले. त्याला असे वाटायचे की, लोक त्याचा खून करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे भास होण्याची वेळदेखील आली.

अनुराग कश्यप यांचा सिनेमा बघत असताना सुशांत रियाला म्हणाला, मी कश्यपच्या सिनेमाची ऑफर नाकारली आहे. तो आता माझा खून करण्यासाठी येईल. रिया या प्रकाराने खुप घाबरली आणि तिला त्याच्यासोबत राहण्याची भीती वाटू लागली. महेश भट यांनी देखील रियाला त्याच्यासोबत राहून आता उपयोग होणार नाही. उलट तू राहिली तर तुझेही मानसिक आरोग्य बिघडेल असे सांगितले. त्यानंतर रियाने तिथे न राहण्याचा निर्णय घेतला. रिया सुशांतची बहिण तिथे येईपर्यंत थांबली. तो त्याची औषधेदेखील घेत नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून सुशांत नैराश्याच्या गर्तेत अगदी खोलवर रुतत गेला होता, अशा धक्कादायक घटनांचा खुलासा सुऱ्हिता सेनगुप्ता यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा –

पीपीई सूटवर डॉक्टरांनी लावले स्वत:चे फोटो; कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -