घरमनोरंजनअक्षय कुमारचा 'लक्ष्मी- बॉम्ब' चा लूक बघून थक्क व्हाल!

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी- बॉम्ब’ चा लूक बघून थक्क व्हाल!

Subscribe

आता लक्ष्मी- बॉम्ब चा लूक प्रदर्शित करत अक्षयने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा एकदा चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.आता अक्षय कुमारने आणखी एका चित्रपटातील लूक शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातील अतरंगी लूक सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना एक सरप्राइज दिले होते. या फोटोमध्ये अक्षय कुमारने साडी नेसली आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

अक्षय कुमारने शेअर केलेला हा फोटो त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ मधील आहे. हा चित्रपट ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. नवरात्रीच्या निमित्ताने अक्षय कुमारने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील हा लूक प्रदर्शित केला आहे.

- Advertisement -

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अक्षय कुमारने लाल रंगाची साडी नेसली असून कपाळी कुंकू आणि हातात लाल बांगड्या घातल्या आहेत. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात अक्षय कुमार एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अक्षयचा हा लूक पाहून तो भूमिकेला योग्य न्याय मिळवून देईल असे म्हटले जात आहे.

नुकताच अक्षयचा मिशन मंगल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. लवकरच हाऊसफुल ४ मध्ये तो धम्माल करताना दिसणार आहे. त्याचबरोबर आता लक्ष्मी- बॉम्ब चा लूक प्रदर्शित करत अक्षयने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -