घरमुंबईअंधेरीत भाजपाच्या माजी नगरसेवकाचे बंड; अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल

अंधेरीत भाजपाच्या माजी नगरसेवकाचे बंड; अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल

Subscribe

अंधेरीत मुरजी पटेल विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अंधेरी विधानसभा क्षेत्रात बंडखोरी करत भाजपाचे माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंधेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांना पुन्हा एकदा संधी दिल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंधेरीत मुरजी पटेल विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे अंधेरी विधानसभा क्षेत्रात युतीचे उमेदवार रमेश लटके विरुद्ध अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांच्यामध्ये चुरस रंगणार आहे. पटेल यांचा विधानसभा क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ते निवडून येण्याची चिन्हे आहेत. सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार मुरजी पटेलच आम्हाला आमदार हवेत, अशी मागणी केल्यामुळे अंधेरीत वातावरण तापले आहे. लटके यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात विकास कामे न केल्यामुळे मतदार नाराज आहेत, त्याच सोबत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचाही रोष व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरीत अनेक विकासकामे प्रलंबित असून चांगली रुग्णालयं, पाण्याचा प्रश्न, वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे, मी अपक्ष लढलो तरी भाजपसोबतच असणार.
मुरजी पटेल, भाजपाचे माजी नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -