घरदेश-विदेशदिल्लीत ४ दहशतवादी घुसले; हाय अलर्ट जारी

दिल्लीत ४ दहशतवादी घुसले; हाय अलर्ट जारी

Subscribe

दिल्ली शहरात जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ३ ते ४ दहशतवादी दिल्लीत शिरले आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दहशतवादी दिल्लीमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्लीत बुधवार रात्रीपासून हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी ९ ठिकाणी छापेमारी केली आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी सर्व उपाययोजना केल्या असून दिल्लीकरांना चिंता न करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

दोन अतिरेकी पाकिस्तानी

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये चार दहशतवादी दाखल झाल्याची बाब समोर आली आहे. हे दहशतवादी दिल्लीत मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जाचा कायदा रद्द केल्याच्या कारणास्तव ते हा दहशतवादी हल्ला करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. चार जणांपैकी दोन जण हे पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांच्या घुसखोरी बाबत सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी ताबोडतोब कारवाई सुरु केली आहे. दिल्लीत बुधवार रात्रीपासून हाय अलर्ट जारी करण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शहरात नऊ ठिकाणी छापेमारी केली. त्याचबरोबर ‘सुरक्षा यंत्रणा सतर्क असून सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत. मिळालेल्या प्रत्येक माहितीवर आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही’, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी, डोवालांवरील दहशतवादी हल्ल्यासाठी जैशचे पथक तयार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -