घरताज्या घडामोडीअभिनेता, दिग्दर्शक आनंद तिवारी 'या' अभिनेत्रीसोबत अडकला लग्नबंधनात

अभिनेता, दिग्दर्शक आनंद तिवारी ‘या’ अभिनेत्रीसोबत अडकला लग्नबंधनात

Subscribe

अभिनेता आणि दिग्दर्शक आनंद तिवारीने शुक्रवारी अभिनेत्री अंगिरा धरसोबत लग्नबंधनात अडकल्याचा खुलासा केला. एप्रिल महिन्यात आनंद तिवारीने अंगिरासोबत लग्न केले. आनंदने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. आनंदने फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘३० एप्रिलला मी आणि अंगिराने आमची मैत्रीला लग्नात बदलले. यादरम्यान काही खास मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील लोकं उपस्थित होते. देव याचा साक्षी आहे. आपले जीवन हळूहळू अनलॉकच्या दिशेने जात आहे. आम्ही पण आमचा आनंद तुमच्यासोबत अनलॉक करू इच्छितो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Anand Tiwari (@anandntiwari)

आनंद तिवारी आणि अंगिरा धरच्या लग्नाबाबत समजताच सोशल मीडियावर प्रतिक्रियेचा पाऊस पडत आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये अनन्या पांडे, अहाना कुमरा, आयुष्मान खुराना, विक्की कौशल यासारखे अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. आयुष्मानने लिहिले आहे की, ‘वाह. दोघांना शुभेच्छा.’

- Advertisement -

दरम्यान अंगिरा धरने देखील लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आनंद तिवारी आणि अंगिरा धरने नेटफ्लिक्सच्या ‘लव्ह पर स्क्वेयर फूट’ चित्रपट एकत्र काम केले होते. आनंद तिवारीने या चित्रपटचे दिग्दर्शन केले होते. तर अंगिरा धर आणि विक्की कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली होती. आनंद तिवारीने ‘गो गोवा गोन’, ‘आइशा’, ‘छपाक’मध्ये काम केले आहे. अॅमेझोनवरील वेबसीरिज ‘बंदिश बँडिट्स’चे दिग्दर्शन आनंद तिवारी केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Angira Dhar (@angira)

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: बोगस केंद्रात लस घेतल्यानंतर मिमी चक्रवर्तींवर गंभीर परिणाम


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -