घरमनोरंजन‘लव्ह सोनिया’ स्थानिक मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा

‘लव्ह सोनिया’ स्थानिक मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा

Subscribe

वेश्या व्यवसायासाठीच्या मानवी तस्करीचा भीषण प्रश्न ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शक तबरेज नुरानी यांनी प्रथमच जागतिक पातळीवरील सिनेमात मांडला आहे.

दुष्काळात होरपळणा-या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबापासून ते मुंबई, बँकॉक आणि अमेरिकेतल्या लास वेगासपर्यंतच्या मोहमयी दुनियेपर्यंत व्यापून राहिलेला वेश्या व्यवसायासाठीच्या मानवी तस्करीचा भीषण प्रश्न ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शक तबरेज नुरानी यांनी प्रथमच जागतिक पातळीवरील सिनेमात मांडला आहे. ‘स्लमडॉग मिलियोनेअर’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या जागतिक पातळीवर गाजलेल्या सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या तबरेज नुरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाचे भारतातील वितरणाचे सर्वाधिकार ‘समराज टॉकीज’ला मिळाले आहेत.

स्थानिक मातीतला पण जागतिक चित्रपट

‘लय भारी’ या मराठीतील अत्यंत गाजलेल्या आणि सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमाची निर्मिती केलेल्या ‘सिनेमंत्र प्रोडक्शन’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. “लव्ह सोनिया हा स्थानिक मातीतला, पण जागतिक सिनेमा आहे. त्यात हाताळण्यात आलेला मानवी तस्करीचा विषय अवघ्या जगाला व्यापून आहे आणि आजही त्या सापळ्यात दररोज नवनवीन महिला-मुली अडकत असतात. हा वेगळ्या वाटेचा आणि आशयघन सिनेमा भारतात सर्वत्र अत्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावा यासाठी त्याच्या मार्केटिंगची तसंच वितरणाची जबाबदारी समराज टॉकीजने स्वीकारली”, असं ‘समराज टॉकीज’च्या शालिनी ठाकरे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -
Love Soniya
लव्ह सोनिया चित्रपटातील एक दृष्य

थेट वास्तवाला भिडणारा चित्रपट

“गेल्या सतरा महिन्यात एकट्या महाराष्ट्र राज्यातील तब्बल ३२ हजार ७६२ मुली बेपत्ता झाल्याचं माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झालेलं आहे. बेपत्ता होणा-या महिलांची सरासरी काढली तर महिन्याला जवळपास दोन हजार, तर दिवसाला सुमारे ६४ महिला-मुली या आपल्या राज्यातून बेपत्ता होत आहेत, गायब होत आहेत. अनेकदा लहान बालकंही पळवली जातात किंवा गरीबीमुळे विकली जातात. ‘लव्ह सोनिया’ हा अशा प्रकारच्या वास्तवाला थेट भिडणारा आणि त्यामागचं सत्य उलगडून सांगणारा सिनेमा आहे”, असं शालिनी ठाकरे यांनी चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.

Love Soniya
लव्ह सोनिया चित्रपटातील एका दृष्यात फ्रईदा पिंटो

पहिल्या टप्प्पात ३५० पेक्षा अधिक चित्रपटगृहात

पहिल्या टप्प्यात ‘लव्ह सोनिया’ हा चित्रपट देशभरातील ३५०हून अधिक चित्रपटगृहांमध्ये दाखला जाणार आहे. ‘लव्ह सोनिया’मध्ये मृणाल ठाकूर, फ्रीदा पिंटो, डेमी मूर, मार्क डप्लास मनोज वाजपेयी, राजकुमार राव, रिचा चढ्ढा, रिया सिसोदिया, अनुपम खेर, आदिल हुसैन, सई ताम्हणकर आणि सनी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -