घरमनोरंजनमाधुरी दीक्षित,अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा ओटीटी वर झळकणार !

माधुरी दीक्षित,अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा ओटीटी वर झळकणार !

Subscribe

एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ओटीटी मध्यम आपले मुळे घट्ट रोवण्यास सफल ठरत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेक धमेकदर वेब सिरिजमुळे ओटीटी माध्यमांचा प्रभाव आणखी वाढला असल्याचे दिसतेय

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा कहर वर्ष-दीड वर्ष पालटले तरी आजही कायम आहे. सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन  जाहीर केल्यामुळे चित्रपटसृष्टीचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीला उतरती कळा लागली आहे. यासोबतच सिनेमागृह बंद असल्यामुळे अनेक बिग बजेट सिनेमांनी ओटीटी प्लॅटफॉर्म कडे आपले पाऊले वळवली आहे. बॉलिवूड मधील अनेक बिगबजेट चित्रपटांना टक्कर देणार्‍या वेब सिरिज दिवसेंदिवस भाव खाऊन जात आहेत. सध्या सिनेमागृह बंद असल्यामुळे वेबसिरिजचा जमाना आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. अनेक बडे कलाकार आता वेब सिरिजमध्ये झळकणार असल्याचे दिसत आहे. लवकरच अभिनेत्री माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सच्या ‘फइंडिंग अनामिका’ वेब सिरिज मध्ये दिसणार आहे. तसेच माधुरीची पहिली वहिली वेब सिरिज असून तिच्यासोबत संजय कपूर मानव कौर यांची वर्णी लागली आहे. नुकतच नेटफ्लिक्सच्या ‘फइंडिंग अनामिका’ वेब सिरिजचा पोस्टर शेअर केलं आहे. याचप्रमाणे बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण सुद्धा ओटीटी वर दमदार एंट्री करणार आहे. ‘लुथर’ या ब्रिटिश वेब सिरिजच्या अधिकृत रिमेक द्वारे अजय देवगन ‘रुद्रा’ या वेब सिरिज मध्ये काम करणार आहे. तसेच ही सिरिज एक सायकोलॉजिकल ड्रामा असून हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज केली जाणार आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका डॅशिंग पोलिस अधिकार्‍याच्या भूमीकेत ‘फॉलन’ या सिरिज मध्ये दिसणार आहे. शिवाय शहीद कपूरदेखील अॅमेझन प्राइम या माध्यमातून डेब्यू करणार असल्याचे बोलले जात आहे . ‘लेगसी’ या वेब सिरीज द्वारे अभिनेता अक्षय खन्ना देखील डिजिटल डेब्यू साठी तयार झाला असल्याचे कळतेय.
एकंदरीतच कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ओटीटी माध्यम आपले मुळे घट्ट रोवण्यास सफल ठरत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेक धमेकदर वेब सिरिजमुळे ओटीटी माध्यमांचा प्रभाव आणखी वाढला असल्याचे दिसतेय. नेटफ्लिक्स,हॉटस्टार,अॅमेझोन प्राइम,सोनी लिव, या सारख्या प्लॅटफॉर्मनी तर आजच्या काळात बाजी मारली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – BirthadaySpecial:नवाझुद्दीन सिद्दिकीचे प्रभावी डायलॉग चाहत्यांच्या आजही आहेत तोंडपाठ पाहुया

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -