घरताज्या घडामोडीपालकांनो मुलांची काळजी घ्या !

पालकांनो मुलांची काळजी घ्या !

Subscribe

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. यापार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांनी पालकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊन शिथील झाला तरी कोरोना जणू संपला असे आपले वर्तन नसावे असे सांगतानाच विशेष करून लहान मुलांची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत.

दुसर्‍या लाटेत ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त किंवा मध्यमवयीन व्यक्तीच नव्हे तर १८ वर्षाखालील मुलांनाही कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेत तर सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा देण्यात आला आहे.परंतु या वयोगटाला लससंरक्षण नसल्याने त्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, दुसर्‍या लाटेचा धोका आता ओसरतोय. रूग्णसंख्या कमी होतेय ही बाब निश्चित दिलासादायक आहे. परंतु दुसरी लाट ओसरत असतांना प्रशासनाने तिसर्‍या लाटेची तयारी केली आहे. खरं म्हणजे काळजी घेऊनही मोठी माणसं कोरोनाबाधित झाली. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याने पालकांनी आतापासूनच काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांतच लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होतील. परंतु कोरोना जणू काही संपला अशारितीने आपल्याला जीवनशैली बदलून चालणार नाही. मुलांना संसर्गापासून रोखायचे असेल तर आधी आपल्याला स्वतःला कोरोना होणार नाही याची काळजी घ्यावी लागले याकरीता कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुलांच्या सवयी बदलाव्या लागतील
मुले ही एका जागी स्थिर राहत नाहीत. ती परिसरातील मुलांमध्ये मिसळतात. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका आहे. लहान मुले आजारी पडले तर त्यांना एका खोलीत १४ दिवस बसवून ठेवणे, घरातील व्यक्तींशी त्यांचा संपर्क होऊ न देण्याचे आव्हान पालकांपुढे आहे. ही परिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता पालकांनी आतापासूनच मुलांना मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता बाळगणे अशा सवयी लावाव्यात असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -