घरताज्या घडामोडीरेमडेसिवीरचा रॅकेटचा पर्दाफाश; नवव्या आरोपीकडून 63 इंजेक्शन जप्त

रेमडेसिवीरचा रॅकेटचा पर्दाफाश; नवव्या आरोपीकडून 63 इंजेक्शन जप्त

Subscribe

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पोलीस तपासात दररोज नवीन खळबळजनक माहिती उघडकीस येत आहे. पोलिसांनी आता नवव्या आरोपीस पालघर जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 63 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.
पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री ११ वाजेदरम्यान के. के. वाघ कॉलजेजवळ राज्यात पहिल्यांदाच तरुणींच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये तीन नर्स व एका फार्मासिस्टचा समावेश आहे. त्यांनतर पोलिसांनी आणखी चौघांना पालघर जिल्ह्यातून अटक करत 20 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले. आत्तापर्यंत पोलिसांनी नऊजणांकडून 85
रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -